जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Exhibition of rare books at Jayakar Knowledge Resource Centre

जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन

मराठीतील प्रसिद्ध लेखकांच्या हस्ताक्षरातील पत्र, कविता, लेखही या प्रदर्शनात पाहायला मिळणारSavitribai Phule Pune University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सव साजरे करत आहे. यासोबतच विद्यापीठातील जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रानेही यावर्षी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त केंद्रातर्फे दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. केंद्राच्या संदर्भ दालन कक्षात भरलेल्या या प्रदर्शानाचे उद्धाटन माजी सहायक ग्रंथपाल डॉ. लता गोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेद्र उपस्थित होत्या. हे प्रदर्शन १२ ते १५ तारखेपर्यंत सर्वासाठी खुले आहे.

या प्रदर्शनात विद्यापीठातील पहिल्या घटना, जसे की पहिला पदवी प्रदान सोहळा, पहिला वर्धापन दिन, विद्यापीठ वार्ताचा पहिला अंक, विद्यापीठाशी निगडीत पहिला वार्षिक अहवाल यांच्यासह पुणे विद्यापीठ कायदा १९४८ यासारखे निवडक ग्रंथ ठेवण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या भेटींचे दुर्मिळ छायाचित्रही ठेवण्यात आले आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, विजयलक्ष्मी पंडीत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

१९५० साली जयकर ग्रंथालयाची स्थापन झाल्यावर येथे आलेले पहिले ग्रंथ, हस्तलिखित, नियतकालिक, शोधप्रबंध, मासिक प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक यांच्या सारख्या महापुरुषांची तर ग.दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे. वसंत कानेटकर, ना.धो. महानोर सारख्या मराठीतील प्रसिद्ध लेखकांच्या हस्ताक्षरातील पत्र, कविता, लेखही तुम्हाला या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. तसेच केंद्राच्या पहिल्या पाच ग्रंथपालांचे छायाचित्रही या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राने विद्यापीठ प्रकाशित वार्षिक वृत्तांकनाचा वेगळा कक्ष सुरू केला आहे. त्यातील काही निवडक ग्रंथही या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद रामराव जयकर यांचा वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह, त्यांना ६ व्या जॉर्जने प्रदान केलेले पदक या प्रदर्शनात विशेष आकर्षनाचे केंद्र बनले आहे. सर्व वाचकांना, साहित्यप्रेमींनी जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संग्रहाची झलक जी इतिहासाची साक्ष देत आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेद्र यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
राज्यात पाच हजार रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री उदय सामंत
Spread the love

One Comment on “जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *