Awareness meeting of Madh Kendra Yojana was held at Pimpri Taluka Maval
मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा पिंपरी तालुका मावळ येथे संपन्न
पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांना होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मालेगाव पिंपरी (ता. मावळ) येथे एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर.खरात, क्षेत्रीय अधिकारी शंकर खंदारे, होप फॉर चिल्ड्रेन्स फाउंडेशन पुणे चे मावळ प्रतिनिधी ऋषिकेश डिंबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बदलत्या हवामानामुळे तसेच शेती उद्योगात वाढत असलेल्या रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा अति वापर वापरामुळे निसर्गातील मधमाशांचे प्रमाण कमी होत आहे, हे प्रमाण कायम राखण्यासाठी तरुणांनी मधमाशा पालन उद्योग करून स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले.
शेती उत्पन्नात अमुलाग्र वाढ घडविण्यासाठी मधमाशा पालन हा संपूरक उद्योग प्रामुख्याने करावा, असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी श्री. खंदारे यांनी केले.
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या शेती व शेती संलग्न व्यवसाय आणि शेतीपूरक कुटीर उद्योग इत्यादींसाठी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना विशेषत: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. मधमाशापालन जतन संवर्धन या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन स्थानिक मधपाळ व शेतकऱ्यांना करण्यात आले.
या प्रसंगी होप फॉर चिल्ड्रेन्स फाउंडेशन पुणे यांच्या मार्फत गावातील शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप देखील करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल
One Comment on “मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा पिंपरी तालुका मावळ येथे संपन्न”