The government released comprehensive guidelines for the effective disposal of C&D waste
बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडून सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी : हरदीप एस पुरी
बांधकाम क्षेत्रात बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचा पुनर्वापर आणि वापराविषयीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या बांधकाम उद्योगाच्या क्षमतेवर प्रकाश टाकताना, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, बांधकाम उद्योग हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. त्याचबरोबर देशात रोजगार देणारा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. अर्थव्यवस्थेमध्ये 250 क्षेत्रांमध्ये ‘फॉरवर्ड’ आणि ‘बॅकवर्ड’ लिंकेज बांधकाम क्षेत्राला आहे. म्हणजे प्रत्यक्ष बांधकामाआधी अनेक कामे करावी लागतात तसेच विविध कामे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर करावी लागतात. 2025 पर्यंत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची बांधकाम बाजारपेठ असेल, असा अंदाज आहे. असे, मंत्री हरदीप पुरी यांनी “बांधकाम क्षेत्रात बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचा पुनर्वापर आणि वापराविषयी अलिकड काळात घडलेला विकास ” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
देशाच्या शहरीकरणाच्या मागणीची आकडेवारी उद्धृत करताना पुरी म्हणाले की, भारताला 2030 पर्यंत दरवर्षी सुमारे 700-900 दशलक्ष चौरस मीटर व्यावसायिक आणि निवासी जागांची आवश्यकता असणार आहे. ते पुढे म्हणाले, जर भारत 2047 पर्यंत विकसित देश बनवायचा असेल, तर त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा घटक महत्त्वाचा असणार आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत पर्यावरणाचा विचार करताना विशेषत: सी अॅंड डी म्हणजेच बांधकाम आणि पाडकाम यांच्या कच-याची विल्हेवाट, ही गोष्ट महत्वाची असल्याचे मान्य करून ते म्हणाले की, वाढत्या बांधकाम क्रियाकलापांसह, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक कार्यक्षम उपाय शोधणे अत्यावश्यक आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
महाराष्ट्राच्या सर्वंकष प्रगतीत सर्व क्षेत्रांचे योगदान गरजेचे – राज्यपाल रमेश बैस
One Comment on “बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी”