Instructions for speedy completion of sports complexes in Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने पूर्ण करावे – मंत्री संजय बनसोडे
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील तालुकास्तरावरील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
आज मंत्रालयात जिल्हा, विभाग, तालुका, क्रीडा विद्यापीठ स्तरावरील क्रिडा संकुलाच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री बनसोडे बोलत होते.
मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद, गंगापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड, वैजापूर येथील क्रीडा संकुलाच्या कामाबाबत आढावा घेतला.
मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. क्रीडा खेळपट्टी बांधण्यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय निकष वेगळे करण्यात यावेत. एखादी इमारत , बांधकाम, प्रेक्षागॅलरीसाठीचे नियम, हॉकीचे मैदान, फुटबॉल, बॅडमिंटनचे सिंथेटीक रोलींग कोर्ट यासाठी तांत्रिक मान्यतेबाबतचे सुधारित धोरण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. लातूर येथील उदगीर क्रीडा संकुल आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त, खेळाडूंना उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देणारे उभारण्यात यावे. त्यासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १७९२ कोटी निधी वितरणास मान्यता
One Comment on “छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुलांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश”