The 23rd convocation ceremony of the University of Health Sciences was concluded in the remote presence of the Governor
राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा संपन्न
मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते डिजिटल माध्यमातून विद्यापीठाच्या ‘ई – प्रबोधिनी : लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम’चे उद्घाटन करण्यात आले, तसेच ‘ब्लूप्रिंट ऑफ बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ या क्रमिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
नाशिक येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या दीक्षान्त सोहळ्याला विद्यापीठाचे प्रकुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, केएलई अकादमी ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च बेळगाव डॉ. नितीन गंगणे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि.) डॉ. माधुरी कानिटकर, प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुम्ब, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाल, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राधिकरणाचे सदस्य, अध्यापक व स्नातक उपस्थित होते.
दीक्षान्त सोहळ्यात १०३०२ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. एकूण २६ उमेदवारांना पीएचडी तर १११ गुणवंत स्नातकांना सुवर्ण पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
‘Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचं निधन
One Comment on “आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा संपन्न”