Bund Garden, Koregaon Park Changes in traffic under Traffic Division on a pilot basis
बंड गार्डन, कोरेगांव पार्क वाहतुक विभागाअंतर्गत वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल
साधुवासवानी पुलाचे काम बांधून पुर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्याच्यादृष्टिने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याकरीता प्रायोगिक तत्वावर बदल
पुणे : बंडगार्डन, कोरेगांव पार्क वाहतूक विभागाअंतर्गत साधुवासवानी पुलाचे काम बांधून पुर्ण होईपर्यंत कोरेगांव पार्क, बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी टाळण्याच्यादृष्टिने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याकरीता पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर यांनी कोरेगांव पार्क व बंडगार्डन वाहतुक विभागाचे हद्दीतील वाहनांच्या वाहतूकीत दुसऱ्या टप्प्याअंतर्गत प्रायोगिक तत्वावर बदल करण्याचे आदेश पारित केले आहेत.
बंडगार्डन, कोरेगांव पार्क वाहतुक विभागाअंतर्गत पर्णकुटी चौक ते ब्ल्यू डायमंड चौक ते मोबोज चौक, मोबाज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड), अलंकार चौक ते आय.बी. चौक ते सर्किट हाऊस चौक ते मोर ओढा चौक, मोर ओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक व कौन्सिल हॉल चौक ते साधुवासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येत आहे. तर काहुन रोड जंक्शन ते तारापुर रोड जंक्शन हा रस्ता पुर्वीप्रमाणेच एकेरी मार्ग राहिल.
नगर रस्त्यावरून मोर ओढा चौकाकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यु डायमंड चौक उजवीकडे वळून मंगलदास रोडने मीबोज चौक, डावीकडे वळून मंगलदास चौकी समोरुन पुन्हा डावीकडे वळून आय बी. (रेसीडेन्सी क्लब) चौक, डावीकडे वळून सर्किट हाऊस चौक, मार्गे मोर ओढा चौकाकडे, मोर ओढा चौक कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहने मोर ओढा चौक, सरळ कौन्सिल हॉल चौक, उजवीकडे वळून मंगलदास चौक, उजवीकडे वळून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळून कोरेगाव पार्ककडे जातील.
पुणे स्टेशन येथून कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहने पुणे स्टेशन, अलकार चौक, डावीकडे वळून जहाँगीर चौक, उजवीकडे वळून मंगलदास चौक, पुणे स्टेशन अलंकार चौक सरळ आय बी चौक, डावीकडे वळून मगलदास चौक, उजवीकडे वळून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वजून कोरेगांव पार्क पुणे स्टेशन ते घोरपडीकडे जाणारी वाहने पुणे स्टेशन ते अलंकार चौक सरळ सर्किट हाऊस चौक मार्गे मोर ओढा चौक, मार्ग इच्छितस्थळी जातीत.
घोरपडी व भैरोबानाला चौकामधुन येणा-या सर्व बसेस (पीएमपीएमएल सह) मोर ओढा चौकाकडुन सरळ जाऊन काहुर रोड जंक्शन वरुन डावीकडे वळण घेवुन तारापुर रोड जंक्शन वर येतील व उजवीकडे वळण घेवुन तारापुर रोडने ब्लु लाईन चौकाकडून उजवीकडे वळण घेवुन कॉन्सिल हॉल चौक मधून इच्छितस्थळी जातील. आय. बी (रेसीडेन्सि क्लब) जंक्शन ते मोर ओढा चौक हा एकेरी मार्ग आवश्यक त्यावेळेस तात्पुरता दुहेरी करण्यात येईल.
या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या जड, अवजड, मल्टीअॅक्सल वाहनांना २४ तास बंदी करण्यात येत आहे, असेही वाहतुक पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
ज्येष्ठ नागरिकांना ‘घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार
One Comment on “बंड गार्डन, कोरेगांव पार्क वाहतुक विभागाअंतर्गत वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल”