विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनीला ‘उत्कृष्ट नाविन्य पूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार’

Savitribai Phule Pune Universiy

Outstanding Innovation Full Academic Achievement Award’ to University Alumni

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनीला ‘उत्कृष्ट नाविन्य पूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार’

महाविद्यालयीन पातळीवर व्यावसायिक उद्योजकते साठी पोषक वातावरण तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम

शाश्वत विकास, व्यावसायिकता, मानवी संसाधन इ. विषयांवर त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध प्रसिद्धSavitribai Phule Pune University

पुणे : विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि नव्या भूमिकेचा अवलंब करणाऱ्या प्राध्यापकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिला जाणारा, ‘उत्कृष्ट नाविन्य पूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार’ या वर्षी, डॉ. शरयू भाकरे यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. शरयू भाकरे या पुणे विद्यापीठाच्याच माजी विद्यार्थी आहेत. गेली २५ वर्षे त्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, सध्या सिंबायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या सेंटर फॉर इंनोवेशन अँड औंत्रेप्रेन्युरशिप या विभागाच्या त्या प्रमुख आहेत. महाविद्यालयीन पातळीवर व्यावसायिक उद्योजकते साठी पोषक वातावरण तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून गेली अनेक वर्ष त्या करत आहेत. शाश्वत विकास, व्यावसायिकता, मानवी संसाधन इ. विषयांवर त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी देखील या विषयांवर शोध निबंध लिहिले आहेत.

या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकार, प्रभारी कुलसचिव (डॉ.) विजय खरे, माजी विद्यार्थी संघाचे संचालक श्री. राजेश पांडे, प्रा. (डॉ.) संजय ढोले, माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा. प्रतीक दामा यांनी डॉ. भाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

परकीय थेट गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर

Spread the love

One Comment on “विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनीला ‘उत्कृष्ट नाविन्य पूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार’”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *