अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

Food-Safety-And-Standards-Authority-of-India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

The Food Testing Laboratory will be inaugurated by Prime Minister Narendra Modi through remote system

बांद्रा-कुर्ला संकुल येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

मुंबई : अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.Food-Safety-And-Standards-Authority-of-India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा समारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार पूनम महाजन, आयुक्त (अन्न) अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रांगणेकर सभागृह, पहिला मजला, अन्न व औषध प्रशासन बांद्रा कुर्ला-संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई येथे होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) यांच्यादेशातील अन्न चाचणी प्रणालीचे बळकटीकरण यासह मोबाईल फूड टेस्टिंग लॅब या योजनेअंतर्गत राज्यात Microbiology प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. बांद्रा-कुर्ला कोम्प्लेक्स, मुंबई येथे Microbiology प्रयोगशाळा उभारणीसाठी एकूण ४५० लाख निधी केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोग शाळेत अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. प्रयोगशाळेत अन्न नमुन्यांचे microbial विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून इथे उच्च कुशल तांत्रिक कर्मचारी (high-skilled worker) नियुक्त केले जाणार आहेत.

प्रयोगशाळा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पाणी, मसाले, फळे आणि भाजीपाला उत्पादने आणि मांस आणि मांस उत्पादने इ. अन्न पदार्थामधील सूक्ष्मजीव दूषित पदार्थचे विश्लेषण करण्यासाठी सुसज्ज करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत कमी कालावधीत जास्तीत जास्त नमुने विश्लेषण करणे शक्य होणार आहे.

प्रयोगशाळा उद्घाटन समारंभास मान्यवर पदाधिकारी, नागरिक आणि प्रसार माध्यमातील प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांनी केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

Spread the love

One Comment on “अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *