भावनगर-दिल्ली मार्गावरील पहिल्या थेट उड्डाणाचे उद्‌घाटन.

Union Minister of Civil Aviation, Shri. Jyotiraditya M. Scindia

भावनगर-दिल्ली मार्गावरील पहिल्या थेट उड्डाणाचे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडून उद्‌घाटन

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ.व्ही.के,सिंग, या मंत्रालयाचे सचिव प्रदीप खरोला यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे गुजरातमधील भावनगर ते दिल्ली या हवाई मार्गासाठी स्पाईसजेटच्या पहिल्या थेट विमानाला हिरवा कंदील दाखवला.  Union Minister of Civil Aviation, Shri. Jyotiraditya M. Scindia

यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मनोगत व्यक्त केले. “वारसा नगरी असणारे भावनगर ते दिल्ली या मार्गावरील पहिल्या थेट विमानसेवेचा प्रारंभ करण्याचे सद्भाग्य मिळणे हा माझा बहुमान आहे. प्राचीन काळापासून या नगरीने संपूर्ण गुजरातच्या आर्थिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हिऱ्यांना पैलू पाडणे, त्यांची चकाकी वाढवणे या उद्योगांचे तसेच जहाजांना मोडीत काढण्याच्या उद्योगाचे भावनगर हे एक केंद्र असून ते केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगात त्यासाठी प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या दोन महत्त्वाच्या उपक्रमांचा संगम भावनगरमध्ये झालेला दिसतो. ते उपक्रम म्हणजे- ‘व्होकल फॉर लोकल (स्थानिक उत्पादनांचा प्रचार-प्रसार करा)’ आणि ‘लोकल टू ग्लोबल (स्थानिक बाजारपेठेपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत) हे होत. त्यांचा मिलाफ दिसून येणारे हे भारतातील प्रमुख शहर आहे.”

भावनगर-मुंबई मार्गावरील विमानसेवेचे तपशील-

भावनगरहून मुंबईकडे येणारी-जाणारी विमाने मंगळवार आणि शनिवार सोडून इतर सर्व दिवशी सेवा देतील. SG 3001 क्रमांकाचे विमान भावनगरहून सकाळी 9:05 वाजता उड्डाण करून 10:10 वाजता मुंबईत उतरेल.

SG 3004 क्रमांकाचे विमान मुंबईहून 14:20 (दुपारी 2:20) वाजता उड्डाण करून 15:25 वाजता भावनगरमध्ये उतरेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *