भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मोबाईल ॲप

Geological Survey of India Mobile App

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मोबाईल ॲप – जनतेसाठी जीएसआयची डिजिटल हाताळणी करण्याच्या दिशेने अभिनव पाऊल.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या खाण मंत्रालयाअंतर्गत 170 वर्ष जुन्या प्रमुख भूवैज्ञानिक संस्थेने स्वतःला जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा  आणि 2020 मध्ये जीएसआय मोबाईल ॲप (बीटा व्हर्जन) लाँच करून आणि वेळोवेळी त्यात  सुधारणा करून डिजिटल पद्धतीने आपली उपस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. या ॲपद्वारे लोकांचे जीएसआय उपक्रमांच्या विविध पैलूंबद्दल अधिक प्रबोधन होईल. हे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेशी सुसंगत आहे.

Geological Survey of India Mobile App
Geological Survey of India Mobile App

ॲप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध असून गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते. 27 ऑगस्ट, 2020 रोजी उदघाटन  झाल्यापासून हे ॲप देशभरातील हजारो लोकांनी डाउनलोड केले आहे आणि आढाव्यांमध्ये 4.5 स्टार आणि Google Play Store मध्ये 3+ रेटिंग देखील मिळाले आहे.

ॲप विविध विभागांमध्ये विभागलेले आहे , ज्यात जीएसआयचा वारसा, संस्थेचे स्वतःचे  प्रकाशन, जीएसआयच्या विविध मोहिमांवरील विविध केस स्टडीज, पिक्चर गॅलरी इत्यादींविषयी माहिती आहे. E-news विभाग लोकांना जीएसआयमध्ये उपलब्ध असलेल्या कामाच्या आणि करिअरच्या संधी तसेच प्रशिक्षण सुविधांबाबत ताजी माहिती देतो. तसेच  जीएसआय कामाचे विविध नकाशे, व्हिडिओ आणि डाउनलोड देखील यात आहेत.  ई-बुक विभाग जनतेला जीएसआयने केलेल्या शोध कार्याची कल्पना देईल. हे GSI चे यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरला  ॲप वरून देखील जोडते. हे ॲप Android OS च्या उच्च आवृत्त्यांसाठी आणि iOS सुसंगत मोबाईल (i-Phones) साठी अद्ययावत   केले जाईल आणि नजीकच्या काळात यात आणखी बरीच वैशिष्ट्ये जोडली जातील.

जीएसआयचे उपक्रम आणि कामगिरी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याव्यतिरिक्त, या ॲपचा उद्देश विद्यार्थी समुदायाचे लक्ष भूविज्ञान विषयाकडे आणि राष्ट्रनिर्मितीमधील त्याच्या महत्वाकडे  आकर्षित करणे हा आहे. जीएसआयने वापरकर्त्यांना आणि सामान्य लोकांना जीएसआयबद्दल आणखी काय जाणून घ्यायचे आहे याविषयी सूचना पाठवण्याची विनंती केली आहे. या  सूचना pro@gsi.gov.inprmcell@gsi.gov.in .वर पाठवता येतील.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *