Immediate measures should be taken to ensure that toilets are adequate and in good condition
महामार्गावरील, तीर्थक्षेत्रमधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात
– विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यभर पेट्रोल पंपावर स्वच्छता गृहांची तपासणी विशेष मोहीम
मुंबई : राज्यातील सर्व महामार्गावरील, पेट्रोल पंपावरील आणि तीर्थक्षेत्र मधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लप्राथमिक क्षित आहेत. ती फार तुटपुंजी असून अनेक ठिकाणी शौचालयात आवश्यक असणाऱ्या सुविधाही नाहीत. त्यामुळे प्रवाशांना व भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्याची अस्तित्वातील सर्व स्वच्छतागृहे ही सुस्थितीत ठेवावीत.
विधानभवनातील सभापती यांच्या दालनात महामार्गावरील व तीर्थक्षेत्रामधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेबाबत बैठक झाली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या.
तसेच ज्या ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत त्या ठिकाणी अद्ययावत अशी स्वच्छतागृहे उभारली जावीत. त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. विशेषतः महिलांसाठीची स्वच्छतागृहे सुस्थितीत राहतील आणि त्यामध्ये पुरेसे पाणी,सॅनिटरी पॅड साठी मशीन,ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कचरा पेटी, हात धुण्यासाठी साबण व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत खबरदारी घेतली जावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांना दिल्या.
त्यापुढे म्हणाल्या की, राज्यभर पेट्रोल पंपावर स्वच्छता गृहांची तपासणी विशेष मोहीम द्वारे करावी. व अस्वच्छ व दुर्लक्षित स्वच्छता गृहे तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छता गृहे उपलब्धतेबाबत ॲप तयार करावे. या ॲपमार्फत उपलब्ध स्वच्छतागृहांची माहिती लोकांना मिळेल. तसेच या स्वच्छता गृहांचे मानांकन करून ॲपवर घ्यावे. त्यामुळे चांगल्या स्वच्छता गृहांची माहिती लोकांना या ॲप मध्ये उपलब्ध होईल.
तसेच आळंदीसह राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळांच्या ठिकाणीही चांगली, आधुनिक व सर्व सोयींनीयुक्त अशी स्वच्छतागृहे बांधावीत, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, याविषयासंदर्भात हमसफर संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याचसोबत प्रत्येक हॅाटेल व रिसॉर्ट मधील स्वच्छतागृहे सर्वांना व विशेषत: महिला प्रवाशांना कायद्याने खुली केली आहेत. परंतु त्याची माहिती सर्वदूर पोहचविण्यात येईल, असे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले. उपसभापती यांनी केलेल्या सूचनांनुसार लवकरच त्या अनुषंगाने तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी उदघाटन
One Comment on “स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात व सुस्थितीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात”