राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण १ लाख ४० हजार दावे निकाली

Lok Adalat is very important for resolving disputes amicably हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

A total of 1 lakh 40 thousand claims were settled in the National Lok Adalat

राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण १ लाख ४० हजार दावे निकाली

२७१ कोटी ४७ लक्ष २९ हजार ४५० तडजोड शुल्क वसूल

पुणे : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ३ मार्च रोजीच्या जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व १ लाख १४ हजार ८८ व तडजोडचे २६ हजार ८१६ असे एकूण १ लाख ४० हजार ९०४ दावे निकाली काढण्यात आले आहेत.National Lok Adalat

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ३ हजार १०५, तडजोड पात्र फौजदारी २० हजार ३२२, वीज देयक ५३८, कामगार विवाद खटले १२, भुसंपादन ४८, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण ९९, वैवाहिक विवाद १०६, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट १ हजार ३५५, इतर दिवाणी ३५०, इतर ६ हजार ७०४, महसूल ५ हजार १०४, पाणी कर १ लाख ३ हजार १६१ अशी एकूण १ लाख ४० हजार ९०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ४६ हजार ६३७ प्रलंबित प्रकरणांमधून २६ हजार ८१६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात २७१ कोटी ४७ लक्ष २९ हजार ४५० तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व १ लाख ९६ हजार ८०६ दाव्यापैकी १ लाख १४ हजार ८८ दावे निकाली काढण्यात येऊन ९८ कोटी ३० लाख ९० हजार ८१८ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण १ लाख ४० हजार ९०४ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ३६९ कोटी ७८ लाख २० हजार २६८ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी दिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

वंचितांना उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्या

Spread the love

One Comment on “राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण १ लाख ४० हजार दावे निकाली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *