Changes in the lives of common people due to philanthropic policies of the government
शासनाच्या लोकोपयोगी धोरणांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ
सांगली : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असून त्यांना न्याय देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने विविध लाभ देण्यात आले. म्हणूनच हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन इस्लामपूर हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी जोमाने कामाला लागले. त्याचाच परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यात 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. दुष्काळी भागासाठी वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत 500 निर्णय घेतले. आतापर्यंत 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम सरकारने केले. सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. तसेच 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. तर उद्योग व्यवसाय वाढीसाठी सरकारने पाच लाख कोटीचे करार केल्याचे सांगून त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसेल. सांगली जिल्ह्यातील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे तसेच पालकमंत्री डॉ. डॉ. खाडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सांगली बहु चांगली’, ‘कृष्णामृत’ पुस्तकांचे प्रकाशन
दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘सांगली बहु चांगली’, या कॉफी टेबल बुक व सांगलीची विविध क्षेत्रातील महती व प्रगती सांगणाऱ्या ‘कृष्णामृत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी या पुस्तकाच्या संपादनासाठी सहाय्य केलेले मंडळ जेष्ठ विधिज्ञ बाबासाहेब मुळीक, जेष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे, अशोक घोरपडे, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर, तत्कालील जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व विद्यमान जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांचा पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
सांगली बहु चांगली या कॉफी टेबल बुकमध्ये सांगली जिल्ह्याच्या स्वातंत्र्यचळवळ, शिक्षण, शेती, उद्योग, सहकार आदि विविध क्षेत्रातील इतिहास व प्रगतीचा चित्रमय आढावा आकर्षक पद्धतीने घेण्यात आला आहे. तसेच कृष्णामृत या पुस्तकात सांगली जिल्ह्याची स्वातंत्र्य चळवळ, राजकीय, शिक्षण, कृषि, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, खाद्य क्षेत्रातील परंपरा विविध तज्ज्ञांच्या लेखणीतून कागदावर उतरली आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा विविध क्षेत्रातील देदीप्यमान, वैभवशाली व अभिमानास्पद वारसा व प्रगती दस्तावेजबद्ध करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय व संपादकीय मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी १९९ कोटींची निधी देणार
One Comment on “शासनाच्या लोकोपयोगी धोरणांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल”