अतिवृष्टीमुळे बाधित  गावांच्या  पुनर्वसनासाठी  १६० कोटी रुपयांचा निधी

Bhumi Poojan of Permanent Rehabilitation Project of Crack Affected Families in Patan Taluk by Chief Minister पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

160 crore fund for rehabilitation of villages affected by heavy rains

अतिवृष्टीमुळे बाधित  गावांच्या  पुनर्वसनासाठी  १६० कोटी रुपयांचा निधी

दरडग्रस्तांना उत्कृष्ट दर्जाची घरे उपलब्ध करुन द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सातारा : पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित आठ गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून बाधितांना उत्कृष्ट दर्जाची घरे देण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.Bhumi Poojan of Permanent Rehabilitation Project of Crack Affected Families in Patan Taluk by Chief Minister
पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मोरगिरी, ता. पाटण येथे दरडग्रस्त कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

संकटकाळात नेहमीच शासनाने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबांना सर्व सुविधायुक्त घरे देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १० टीएमसीने वाढ होईल. सातारा जिल्ह्यात अनेक सोयी-सुविधा, प्रकल्प सुरु असून २२५ मॉडेल स्कुल, ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. मुनावळे प्रमाणेच पाटणमध्ये करण्यात येणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगून शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाला चालना दिल्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ४२६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून सर्व प्रकल्प पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, अतिवृष्टीमुळे आंबेघर (खालचे, वरचे), ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी आणि काहीर या आठ भूस्खलनबाधित गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पुनर्वसनासाठी आवश्यक भूसंपादन करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी मंजूर करण्यात आला आहे. आठ गावांतील ४९९ कुटुंबांचे यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन होणार असून पुनर्वसित ठिकाणी अंतर्गत रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक एकल विद्युत जोडणी, अंगणवाडी, खेळाचे मैदान, समाजमंदिर इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

महसूल अधिकाऱ्यांना वाहनांचे लोकार्पण

सातारा जिल्ह्यात राज्यात प्रथमच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना देखील ईनोव्हा गाड्या देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मल्हारपेठ पोलीस ठाणे प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे निवासस्थानांचे ई-लोकार्पण

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मल्हारपेठ पोलीस ठाणे प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे तसेच पाटण पोलीस ठाणे येथील अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे ई-लोकार्पण करण्यात आले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रविराज देसाई , जयराज देसाई, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

दापोली व मंडणगड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Spread the love

2 Comments on “अतिवृष्टीमुळे बाधित  गावांच्या  पुनर्वसनासाठी  १६० कोटी रुपयांचा निधी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *