अहमदनगर शहर आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The Ahmednagar city is now ‘Punyashlok Ahilya Devi Nagar’

अहमदनगर शहर आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ केल्याने अहमदनगर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रवासियांच्या इच्छेची पूर्तता – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed development projects in the state राज्यातील विकासप्रकल्पांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

मुंबई : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे.

हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

वेल्हे तालुक्याला ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव

Spread the love

One Comment on “अहमदनगर शहर आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *