Stress management workshop for women employees held
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महिला दिनाच्या निमीत्ताने महिला कर्मचाऱ्यांसाठी ताण – तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
पुणे : बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ताण -तणाव व्यवस्थापन या विषयावर नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी स्वतः संशोधन करून विकसीत केलेल्या ताण-तणावाचे संतुलन करण्याच्या पद्धतींच्या आधारे घेतली.
यामध्ये दिवसभर प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी चार सत्रांमध्ये ताण-तणावाचे स्वरूप त्यांच्या व्यवस्थापन या संबंधीतील प्रत्यक्ष कृतीदवारे, प्रश्नावलीच्या सहाय्याने, संवाद पद्धतीच्या आधारे केले.
या कार्यशाळेला महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये ७१ महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अशा कार्यषाळा वारंवार घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी श्रीमती चारूशीला गायके यांनी केले. तसेच त्यांनी कार्यशाळेला दिवसभर उपस्थित राहून महिला कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी उपस्थिती लावली. प्रा. डॉ. काळकर यांनी त्यांच्या भाषणात सांगीतले की, ताण-तणावाचे व्यवस्थापन हा त्यांच्या संशोधनाचा विषय असल्यामुळे त्यांच्या आवडीचा विषय आहे. प्रा. डॉ. काळकर यांनी ताण-तणाव नियमनामागची महत्वाची कारणे सांगताना नमुद केले की, आपण तुलना करतो, समत्वबुदधी ठेवत नाही. नको त्या सर्व बाबींवर मत व्यक्त करत बसतो. याएवेजी मी आनंदी असून कोणतीही बाहय गोष्ट माझ्या आनंदात बाधा आणू शकत नाही असे सांगीतले. तसेच भारतीय परंपरेमध्ये ताण-तणावमुक्त आनंदी आयुष्य जगण्याची अनेक तंत्रे असून आज आपणही विसरून गेलो आहोत असेही अधोरेखीत केले.
कार्यशाळेच्या समारोपाला प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. कार्यशाळेची मुळ संकल्पना खरे सरांची होती. ती प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीचे निर्देष त्यांनी बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे मानद संचालक प्रा. डॉ. हरिश्चन्द्र नवले यांना केले होते. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या मानसीक व शारीरीक आरोग्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करत राहील असे उपस्थितांना आश्वासित केले. कर्मचारी आनंदी असले तर विद्यापीठाच्या विकासाला गती येते. म्हणून मानसीक आरोग्यावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला प्रा. डॉ. खरे यांनी दिला. तसेच त्यांनी बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे अभिनंदन केले व दर तीन महीन्यांनी अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत जावेत असे सुचविले. प्रा. डॉ. खरे यांनी प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांच्या मानवशास्त्रातील योगदानाबद्दलची माहीती सांगुन त्यांच्या ज्ञानाच्या व कौसल्याच्या विशेष उपयोग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्याचा मानस व्यक्त केला.
बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे मानद संचालक प्रा. डॉ. हरिश्चन्द्र नवले यांनी मा. कुलगुरूंचे कार्यक्रमास तात्काळ मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच प्र-कुलगुरू यांनी अत्यंत व्यस्त असतानासुदधा आवडीचा विषय म्हणून तर प्रभारी कुलसचिव यांनी कर्मचाऱ्यांचे हीत साधण्यासाठी उपस्थित राहून दिलेल्या पाठबळासाठी आभार मानले. वित्त व लेखा अधिकारी श्रीमती गायके यांनी कार्यशाळेचे उद्घाटन करून आवडीने सहभाग देखील घेतला याबद्दल आभार मानले. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी मार्च अखेरच्या कामाचे उद्दीष्ट असतानाही वेळ काढून उपस्थिती लावली याबददल आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ
One Comment on “महिला कर्मचाऱ्यांसाठी ताण – तणाव व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न”