भारताची  पहिली कोविड -19 mRNA लस विकसित.

डीबीटी -बीआयआरएसीचे पाठबळ लाभलेली देशातील  पहिली mRNA- आधारित लस सुरक्षित असल्याचे आढळले असून भारतीय औषध महानियंत्रकानी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला दिली मंजुरी.


मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत डीबीटी -बीआयआरएसीच्या भागीदारीतून भारताची  पहिली कोविड -19 mRNA लस विकसित करण्यात आली.

जिनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड,ही पुणे स्थित जैवतंत्रज्ञान कंपनी, देशाच्या पहिल्या एमआरएनए mRNA- आधारित कोविड -19 लसीवर काम करत आहे.  पहिल्या टप्प्यातील अभ्यासाचा अंतरिम क्लिनिकल डेटा  केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला (CDSCO)सादर करण्यात आला.

लसींबाबत विषय तज्ज्ञ समितीने   पहिल्या टप्प्यातील अंतरिम डाटाचा आढावा घेतला , ज्यात  असे दिसून आले की अभ्यासात  सहभागी झालेल्यांमध्ये HGCO19 सुरक्षित, सुसह्य आणि रोगप्रतिकारक आहे.

mRNA लस संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी एक नवीन प्रकारची लस आहे. रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी, अनेक लस आपल्या शरीरात कमकुवत किंवा निष्क्रिय जंतू टाकतात. एमआरएनए लस नाही. त्याऐवजी, ते आपल्या पेशींना प्रथिने कशी बनवायची ते शिकवतात – किंवा अगदी प्रथिनांचा एक तुकडा – जो आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतो. अँटीबॉडीज निर्माण करणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया, जर वास्तविक विषाणू आपल्या शरीरात शिरला तर आपल्याला संसर्ग होण्यापासून वाचवते.

 

जिनोवाने प्रस्तावित दुसरा  आणि तिसऱ्या टप्प्यातील अभ्यास सादर केला. निरोगी व्यक्तींमध्ये  HGCO19 (कोविड -19 लस)  लसीची सुरक्षितता, सहनशीलता आणि प्रतिकारशक्ती याचे मूल्यमापन करण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्यात आल्या होत्या, ज्याला  केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या महानियंत्रक कार्यालयाने मंजुरी दिली.

चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात अंदाजे 10-15 ठिकाणी  आणि तिसऱ्या टप्प्यात 22-27 ठिकाणी चाचण्या घेतल्या जातील. यासाठी डीबीटी-आयसीएमआर क्लिनिकल ट्रायल नेटवर्क साइट्स वापरण्याची जिनोवाची योजना  आहे.

जिनोवाच्या mRNA- आधारित कोविड -19 लस विकास कार्यक्रमाला सीईपीआय अंतर्गत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT)जून 2020 मध्ये अंशतः  निधी दिला होता.  नंतर, बीआयआरएसी द्वारे  अंमलबजावणी केली जात असलेल्या  मिशन कोविड सुरक्षा- द इंडियन कोविड -19 लस विकास मिशनला  डीबीटीने आणखी पाठिंबा दिला.

डीबीटीच्या सचिव आणि बीआयआरएसीच्या अध्यक्ष, डॉ. रेणू स्वरूप म्हणाल्या की, “ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाची पहिली एमआरएनए-आधारित लस सुरक्षित असल्याचे आढळले आहे आणि भारतीय औषध महानियंत्रकांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली. आम्हाला विश्वास आहे की भारत आणि जगासाठी ही एक महत्वाची लस असेल. आपल्या स्वदेशी  लस विकास मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा असून लसीच्या विकासात जागतिक नकाशावर भारताला स्थान मिळवून दिले आहे.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *