पुणे जिल्हयात फेरफारअदालतीला चांगला प्रतिसाद ,4 हजार 168 नोंदी निर्गत.
पुणे जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एका दिवसात 4 हजार 168 नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुस-या बुधवार या कालावधीत महसूल मुख्यालयात फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, कोविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्हयात माहे ऑगस्ट 2021 च्या चौथ्या बुधवारी दि.25 ऑगस्ट रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. फेरफार अदालतीस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून सदर फेरफार अदालतीमध्ये साध्या 3 हजार 382, वारस- 684 तक्रारी -102 अशा एकूण 4 हजार 168 फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.
तालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गत
हवेली 259, पुणे शहर 20, पिंपरी चिंचवड 184, शिरुर 374, आंबेगाव 240, जुन्नर 493, बारामती 935, इंदापूर 420, मावळ 174, मुळशी 120, भोर 144, वेल्हा 116, दौंड 364, पुरंदर 125, खेड 200 अशा एकूण 4 हजार 168 अशी आहे फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले.
फेरफार निर्गतीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी दर महिन्याच्या दुस-या बुधवारी महसूल मुख्यालयात फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत, यामुळे नागरिकांच्या फेरफार नोंदी तात्काळ निर्गत करण्यास मदत होणार आहे.