खादीला ‘राष्ट्रीय वस्त्र’ मानण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन.

‘Transforming India’s Mobility’

खादीला ‘राष्ट्रीय वस्त्र’ मानण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन उपराष्ट्रपतींनी शौर्य, प्रतिकार आणि देशनिष्ठा यांचे युग असे केले आहे

‘खादी इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेचा ‘उपराष्ट्रपतींनी केला आरंभ. ‘Transforming India’s Mobility’

उपराष्ट्रपती, श्री. एम. व्यंकय्या नायडू यांनी नागरीकांना खादीला ‘राष्ट्रीय वस्त्र’ म्हणून  मानण्याचे आणि त्याचा अधिकाधिक वापर करण्याला  प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

उपराष्ट्रपती, श्री. एम. व्यंकय्या नायडू यांनी विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींना त्याकरीता पुढे येण्याचे आणि खादीच्या वापराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या  ‘खादी इंडिया प्रश्नमंजुषा ‘ स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपराष्ट्रपती बोलत होते.

सर्वांना ‘खादी इंडिया प्रश्नमंजुषा’ या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, ही स्पर्धा आम्हाला आमच्या उगमाकडे परत नेण्याचा एक मनोरंजक मार्ग आहे, कारण ती आमच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ऐतिहासिक क्षणांची आणि आमच्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या अतुलनीय योगदानाची आठवण करून  देते.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे  शौर्य, प्रतिकार आणि निष्ठावान देशभक्तीची गाथा म्हणून वर्णन करताना, उपराष्ट्रपतींनी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वसाहतवादी राजवटीविरूद्धच्या लढाईत संपूर्ण देशभरातील जनतेला कसे प्रेरित केले, याचा उल्लेख केला.

ते म्हणाले, की आमचा स्वातंत्र्य संग्राम हा प्रतिकार आणि आशेचा असा एक  प्रवास होता, की “ज्यामुळे आम्हाला परिस्थिती कितीही प्रतिकूल असली  तरी सतत पुढे चालत राहण्याची प्रेरणा मिळाली “.

श्री. नायडू यांनी गेल्या 7 वर्षात खादीने केलेल्या  अभूतपूर्व प्रगतीबद्दल संतोष  व्यक्त केला आणि तिच्या  वाढीला गती देण्यासाठी सरकार, केव्हीआयसी आणि सर्व हितसंबंधितांनी केलेल्या प्रयत्नांची  प्रशंसा केली.

उपराष्ट्रपतींनी खादीच्या ऐतिहासिक प्रासंगिकतेचे (संबंधांचे) स्मरण करून दिले आणि पुढे म्हटले की, स्वातंत्र्य चळवळीदरम्यान ती जनतेला एकत्र जोडणारी शक्ती होती.

खादीच्या पर्यावरणीय फायद्यांचा उल्लेख करताना उपराष्ट्रपतींनी नमूद  केले, की खादीतून होणारे  कार्बन उत्सर्जन शून्य असते कारण त्याच्या निर्मितीसाठी वीज किंवा कोणत्याही प्रकारच्या इंधनाची आवश्यकता नसते.

उपराष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना गणवेशासाठी खादीच्या वापराची  शक्यता तपासून पहाण्याचे आवाहनही यावेळी केले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, श्री नारायण राणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, श्री भानु प्रताप सिंह वर्मा, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सचिव, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग,सचिव श्री. बी. बी. स्वैन आणि इतर अधिकारी या  कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *