आठवड्यातील महत्वाच्या बातम्या.
दि. १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुचना, हरकती सादर करण्यासाठी मुदतवाढ.
पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसित करताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून येणाऱ्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरतील, आराखड्याला अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा अंतर्भाव करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
विधानभवन येथील सभागृहात पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांनी प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
विधानभवन येथील सभागृहात पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याला अंतिम स्वरुप देताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून येणाऱ्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरतील, आराखड्याला अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा आंतर्भाव करावा, वाढते नागरिकरणाचा विचार करून भविष्यातील सर्वच बाबींचा विचार आराखड्यात केला जावा, असेही त्यांनी सांगितले.
सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर किल्क करा ……
गांधी जयंतीपासून मोफत घरपोच सातबारा मोहीम.
महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे, आज श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी घोषणा केली.
सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर किल्क करा ….
https://www.hadapsarinfomedia.com/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a4%a4-%e0%a4%98%e0%a4%b0/
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी ई-नॉमिनेशन महत्वाचे.
कोविड-19 महामारीच्या काळात, अनेक लोक आर्थिक आधारासाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीवर अवलंबून होते, असे आढळून आले, मात्र, यापैकी अनेक लोकांना आपल्या पीएफचे दावे वळते करण्याच्या प्रक्रियेत, त्यांनी नॉमिनेशन (आपल्यानंतरच्या वारसदाराचे नाव) न भरल्यामुळे, त्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोणत्याही बचत योजनेत ठेवीदाराने आपल्या वारसदाराच्या नावाचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे, याआधी, पीएफ खातेधारकांना फॉर्म क्रमांक-2 भरुन तो संबंधित पीएफ कार्यालयात नेऊन द्यावा लागत असे. मात्र, डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत, पीएफ खातेधारकांना घरीच बसून केवळ काही मिनिटांत, ऑनलाईन हा नॉमिनेशन फॉर्म भरता येणार आहे.
सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर किल्क करा ….
राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
शाळांमधील भौतिक सुविधांचा तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करून आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल. भौतिक सुविधांच्या विकासामध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश राहील.
सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर किल्क करा ….
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत
- पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यावर शासनाचा भर.
- कोरोनाबाधित रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही.
- पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश.
- शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश.
पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत, मात्र नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर किल्क करा ….
कॉर्बेव्हॅक्स या कोविड-19 प्रतिबंधक लसीला दोन क्लिनिकल चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून मान्यता.
- प्रौढ लोकसंख्येमध्ये सक्रिय नियंत्रित तिसरा टप्पा क्लिनिकल चाचणी.
- लहान मुलांमध्ये आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये (5 वर्षे आणि त्याहून अधिक) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी.
जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, यांनी कोविड -19 लसींच्या संशोधन आणि विकास व निर्मितीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
जैवतंत्रज्ञान विभाग आणि त्याची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी)ने बायोलॉजिकल ई.च्या कोविड -19 लसीच्या प्रीक्लिनिकल टप्पा ते तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचणीला पाठिंबा दिला आहे. मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्याबरोबरच, या लसीला बीआयआरएसीच्या नॅशनल बायोफार्मा मिशनच्या माध्यमातून कोविड -19 संशोधन समुहाअंतर्गत आर्थिक सहाय्य देखील लाभले आहे.
सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर किल्क करा ….