जाणून घ्या पवनदीप राजन विषयी , इंडियन आयडॉल 12 चा विजेता .

Pawan Deep Rajan

जाणून घ्या पवनदीप राजन विषयी , इंडियन आयडॉल 12 चा विजेता 

इंडियन आयडॉल 12 अलीकडील एक सर्वात  मोठा हिट रियालिटी शो  होता. शोचे अंतिम स्पर्धक पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, निहाल तोरो, सायली कांबळे, षण्मुखप्रिया आणि मोहम्मद दानिश होते.  पवनदीप राजन ला  या रियालिटी शो चा विजेता घोषित करण्यात आले. इंडियन आयडॉल 12 शो च्या या हंगामात अनेक विक्रम मोडीत निघाले. हे त्याचप्रमाणे सर्वात उल्लेखनीय टीआरपी या शो ला मिळाली आणि  ह्या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाळ  खूप प्रसिद्धी मिळाली.  Pawan Deep Rajan

पवनदीप राजन बद्दल

पवनदीप राजन एक उत्तम  आणि बहुआयामी भारतीय गायक, ज्याने अलीकडेच गायन रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल 2021 स्पर्धा जिंकली. इंडियन आयडॉल 12 गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्यापासून सुमारे नऊ महिने चालली. ह्या  शो चे अनु मलिक, हिमेश रेशमिया आणि सोनू कक्कड हे परीक्षक होते ,आणि उदित नारायणचा मुलगा आदित्य आणि टीव्ही मनोरंजनकार जय भानुशाली यांनी सूत्रसंचलनची भूमिका पार पाडली.  

पवनदीप राजन याचा जन्म 27 जुलै 1996 रोजी चंपावत, उत्तराखंड येथे झाला.   त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चंपावतमध्ये केले. त्याने कुमाऊँ विद्यापीठ नैनीतालमधून पदवी प्राप्त केली आहे. त्याचे वडील सुरेश रंजन हे गायक आहेत. ते उत्तराखंडमधील कार्यक्रमांमध्ये आणि फंक्शन्समध्ये गातात .

पवनदीपला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे खूप लहान वयातच संगीत शिकायला सुरुवात केली. तो दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्याला  तबला भेट दिला.  त्याने तबला वाजवण्यास सुरुवात केली आणि त्याने वयाच्या 2 व्या वर्षी सर्वात तरुण तबला वादकाचा पुरस्कार जिंकला. तो कीबोर्ड, पियानो, ड्रम गिटार इत्यादी इतर अनेक वाद्ये देखील वाजवतो. त्याने स्पर्धेत उत्तम ढोलकी वाजवून परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली.  तो एक लोकप्रिय लोकगीत गायक देखील आहे. 

पवनदीप आणि त्याच्या महाविद्यालयातील मित्रांनी 2014 मध्ये ‘RAIT’ बँड सुरू केला. ते स्थानिक नाट्यगृह आणि महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये सादर करायचे. महाविद्यालयीन जीवनादरम्यान, पवनदीपला 2015 मध्ये रिअॅलिटी टीव्ही शो ‘द व्हॉईस ऑफ इंडिया’ गाण्याच्या ऑडिशनबद्दल एका वृत्तपत्रातील जाहिरात समोर आली. टीव्ही शो ‘द व्हॉईस ऑफ इंडिया’ मध्ये जाण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी त्याने गायनाचे प्रशिक्षण सुरू केले. स्पर्धेत प्रवेश केल्यानंतर त्याने भारतीय गायक शान यांची मार्गदर्शनाखाली अंतर्गत प्रशिक्षण सुरू केले. त्याने ही स्पर्धा जिंकली. त्याला रु .50 लाख  ची रोख रक्कम आणि मारुती अल्टो के 10 कार देण्यात आली, त्याने आपले पहिले गाणे रिलीज करण्यासाठी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत करार देखील जिंकला. स्पर्धा जिंकल्यानंतर पवनदीपने 2015 मध्ये युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप ‘याकीन’ सह पदार्पण केले.

2016 मध्ये उत्तराखंड सरकारने त्यांची ‘यूथ ब्रँड अॅम्बेसेडोर’ म्हणून नियुक्ती केली होती. 

त्यानंतर पवनदीप हारून हॅरोन रशीद सोबत त्यांनी ‘छोलियार’ या अल्बमसाठी दोन गाणी गायली. त्यांनी 2017 मध्ये ‘रोमियो आणि बुलेट’ या रोमँटिक चित्रपटासाठीही गाणे गायले. दरम्यान, त्यांनी भारतात  आणि दुबईमध्ये विविध शो केले. 

पवनदीपने गायनाव्यतिरिक्त अभिनेता म्हणून काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले. त्यांनी ‘पांघरुणं’, ‘किंडनॅप’ आणि ‘एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी  महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित आणि 1962 च्या चीन-भारतीय युद्धाने प्रेरित हिंदी वेब सिरीज १९६२ ‘द वॉर इन द हिल्स’ मध्ये नोडो टानाच्या भूमिकेतही काम केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *