किफायतशीर आणि आलिशान वातानुकुलीत रेल्वेच्या नव्या 3 AC इकॉनॉमी कोचच्या सेवेचा प्रारंभ.

Indian Railways. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

किफायतशीर आणि आलिशान वातानुकुलीत प्रवासाचा अनुभव देण्यासाठी, भारतीय रेल्वेच्या नव्या 3 AC इकॉनॉमी कोचच्या सेवेचा प्रारंभ.

सुरुवातीला, 50 नवीन 3AC इकॉनॉमी डबे वेगवेगळ्या प्रांतात सेवा देण्यासाठी सज्ज. Indian Railways

प्रवाशांना  सोयीस्कर अशा वैशिष्ट्यांसह रेल्वे डबे विकसित करत प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच वचनबद्ध असते. भारतीय रेल्वेच्या या विकासात्मक प्रवासात नव्याने प्रवेश करणारा घटक म्हणजे एसी थ्री टायर इकॉनॉमी क्लासचा डबा आहे. या नवीन डबा आजपासून सेवेत आला आहे. प्रथमच, हा डबा ट्रेन क्रमांक 02403 प्रयागराज – जयपूर एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. 3AC इकॉनॉमी डब्यातील 72 बर्थच्या तुलनेत या नवीन वातानुकुलीत इकॉनॉमी डब्याला 83 बर्थ आहेत. तसेच, या डब्यासाठी प्रवास भाडे 3AC डब्यापेक्षा 8 % कमी आहे.

लवकरच, आणखी दोन गाड्या, ट्रेन क्र .02429/02430 नवी दिल्ली-लखनौ एसी स्पेशल आणि ट्रेन क्र .02229/02230 लखनौ मेल या 3AC इकॉनॉमी कोचसह वाढवल्या जातील. सुरवातीला, रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथला द्वारा उत्पादित 50 नवीन इकॉनॉमी डबे वेगवेगळ्या झोनमध्ये मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सेवा देण्यासाठी तयार आहेत.

प्रवाशांची सोय सुधारण्यासाठी अनेक डिझाइन सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत. एसी डक्टिंगची नवीन रचना सर्व बर्थसाठी वैयक्तिक व्हेंट्स प्रदान करून केली गेली आहे. आसन आणि बर्थची सुधारित आणि मॉड्यूलर रचना आरामदायी बनवण्यासाठी, बोगीचे वजन कमी करण्यासाठी आणि देखभाल सुधारण्यासाठी केली गेली आहे.

कोचच्या आतील भागात ल्युमिनेसेंट आयल मार्कर, ल्युमिनेसेंट बर्थ क्रमांकांसह रात्रीच्या दिवेसह अविभाज्य बर्थ इंडिकेटर्स आहेत.
सामग्रीसाठी EN45545-2 HL3 च्या जागतिक बेंचमार्कचे पालन सुनिश्चित करून अग्निसुरक्षा सुधारली आहे, अशा प्रकारे नवीन अग्निसुरक्षा मानकाच्या उच्च आवश्यकता पूर्ण केल्या आहेत.

एसी 3 – टायर इकॉनॉमी क्लास कोचची मुख्य रचनात्मक वैशिष्ट्ये –

* बर्थच्या क्षमतेत 72 वरून  83 पर्यंत वाढ

* सिट आणि बर्थची आधुनिक आणि सुधारित रचना

* दोन्ही उभ्या आणि आडव्या रांगेमध्ये दुमडून ठेवता येईल अशा (फोल्डेबल) नाश्त्याच्या टेबलची सोय

* प्रत्येक बर्थसाठी वैयक्तिक एसी व्हेंट

* दिव्यांगजनांसाठी प्रत्येक डब्यामध्ये शौचालयाचा रूंद दरवाजा आणि रूंद प्रवेशद्वार

* प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी वैयक्तिक दिवा आणि यूएसबी चार्जिंग पॉइंट

* मधल्या आणि वरच्या अशा दोन्ही बर्थसाठी हेडरूममध्ये  वाढ

* सार्वजनिक आणि प्रवाशांना माहिती देण्यासाठी  प्रणाली

* अग्नी सुरक्षेसाठी. जागतिक स्तरावरच्या, EN45545 – 2HL3 पद्धतीची सामग्री वापरून अग्निसुरक्षेत सुधारणा

* सीसीटीव्ही कॅमेरा

* वरच्या आणि मधल्या बर्थमध्ये प्रवेश करण्यासाठी शिडीची सुधारित रचना

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *