आठवड्यातील महत्वाच्या बातम्या –

Hadapsar Info Media

मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर, कर्नाटकमधील बॉईज स्पोर्ट्स, कंपनीच्या कुस्ती, क्रीडा विभागात मुलांची भर्ती (म्हैसूर,कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेशातील) 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार

  1. मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर (कर्नाटक)च्या बॉईज स्पोर्ट्स  कंपनीतर्फे, जिल्हा पातळीवर क्रीडा कॅडेट्ससाठी प्रवेशिका मागवल्या जात आहेत.  यासाठीची प्रवेश प्रक्रिया 27 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर दरम्यान या रेटीमेन्ट केंद्रांवर घेतली जाईल. मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटरच्या कुस्ती विभागासाठी ही निवड प्रक्रिया केली जाणार आहे.
  2. पात्रता निकष.

मराठा लाईट इन्फ्रट्री रेजिमेंटल सेंटर, कर्नाटकमधील बॉईज स्पोर्ट्स, कंपनीच्या कुस्ती, क्रीडा विभागात मुलांची भर्ती.

 

 

किफायतशीर आणि आलिशान वातानुकुलीत प्रवासाचा अनुभव देण्यासाठी, भारतीय रेल्वेच्या नव्या 3 AC इकॉनॉमी कोचच्या सेवेचा प्रारंभ.

सुरुवातीला, 50 नवीन 3AC इकॉनॉमी डबे वेगवेगळ्या प्रांतात सेवा देण्यासाठी सज्ज.Indian Railways

प्रवाशांना  सोयीस्कर अशा वैशिष्ट्यांसह रेल्वे डबे विकसित करत प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच वचनबद्ध असते. भारतीय रेल्वेच्या या विकासात्मक प्रवासात नव्याने प्रवेश करणारा घटक म्हणजे एसी थ्री टायर इकॉनॉमी क्लासचा डबा आहे. या नवीन डबा आजपासून सेवेत आला आहे. प्रथमच, हा डबा ट्रेन क्रमांक 02403 प्रयागराज – जयपूर एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. 3AC इकॉनॉमी डब्यातील 72 बर्थच्या तुलनेत या नवीन वातानुकुलीत इकॉनॉमी डब्याला 83 बर्थ आहेत. तसेच, या डब्यासाठी प्रवास भाडे 3AC डब्यापेक्षा 8 % कमी आहे.

 

किफायतशीर आणि आलिशान वातानुकुलीत रेल्वेच्या नव्या 3 AC इकॉनॉमी कोचच्या सेवेचा प्रारंभ.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्ज पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली

संचार मंत्रालय, टपाल खात्याच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आणि देशाची प्रमुख गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) ने आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या  4.5 कोटी ग्राहकांना गृह कर्ज उत्पादने पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 650  शाखांचे  मजबूत आणि व्यापक जाळे  आणि 136,000 पेक्षा जास्त बँकिंग ऍक्सेस  पॉइंट्सद्वारे, एलआयसी हाऊसिंग फायनान्सची गृह कर्ज उत्पादने संपूर्ण भारतातील ग्राहकांना उपलब्ध करून देईल.

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्ज पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली

शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई.

शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने देणे सुरु.

दोषी अर्जदार अनुज्ञप्तीसाठी कायमस्वरुपी अपात्र ठरणार.

Maharashtra Motor Vehicle Division
Regional Transport Office

नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक १४ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परीक्षा देणे अनिवार्य असून या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करुन अनुज्ञप्ती मिळवणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचना देखील संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई.

डेल्टा या विषाणूच्या नव्या प्रकाराविरुद्ध आपली  कोविड लस किती प्रभावी आहे?

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोविडयोग्य वर्तणूकीचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे – कोविड कार्यकारी समूहाच्या अध्यक्षांनी दिला सावधगिरीचा इशारा

भारताच्या कोविड -19 राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष (NTAGI)अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी भारताच्या कोविड -19 लसीकरण मोहिमेबाबत दूरदर्शन न्यूजला दिलेल्या मुलाखतीमधील काही  महत्वाचे मुद्दे .

प्रश्न – भारतात कोविड -19 ची तिसरी लाट येईल का?Covid-19-Pixabay-Image

आपल्या देशात गेल्या अनेक आठवड्यांपासून 30,000 ते  45000 इतकी दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. ही संख्या मुख्यतः विशिष्ट भौगोलिक प्रदेशांतून , विशेषत: केरळ, अनेक ईशान्येकडील राज्ये आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच  काही इतर दक्षिणेकडील राज्यांमधून नोंदवली जात आहे. जर आपण जून, जुलै आणि ऑगस्ट दरम्यान आढळलेल्या SARS-COV-2 विषाणूंच्या जीनोमिक विश्लेषण पाहिले , तर कोणताही नवीन स्वरूपाचा विषाणू आढळलेला नाही. जुलै महिन्यादरम्यान केलेल्या सीरो-सर्वेक्षणाच्या आधारावरून असे लक्षात येते की , ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशाच रुग्णांना संसर्ग झालेला आढळून आला आहे. दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात हे रुग्ण मुख्यतः प्रभावित झालेले दिसून आले.

डेल्टा या विषाणूच्या नव्या प्रकाराविरुद्ध आपली  कोविड लस किती प्रभावी आहे?

 

देशाची सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी आणीबाणीच्या स्थितीत विमान उतरविण्यासाठीच्या सुविधा अन्य 19 ठिकाणी विकसित करणार – नितीन गडकरी.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सांगितले की,  देशाची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी अन्य  19 ठिकाणी आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठीच्या ‘इमर्जन्सी लँडिंग’ सुविधा विकसित केल्या जातील. संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्यासह राजस्थानमधील राष्ट्रीय महामार्ग 925ए वर ‘इमर्जन्सी लँडिंग’ सुविधेचे उद्‌घाटन करताना ते म्हणाले की, ही  महामार्गावरील विमानासाठीची धावपट्टी  सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सीमांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने देशाची सुरक्षा आणखी बळकट  करेल.Nitin-Gadkari-Rajnath-Singh-Barner-visit

श्री गडकरी यांनी सांगितले की, राजस्थानमधील फलोदी – जैसलमेर रस्ता  आणि बाडमेर – जैसलमेर रस्त्यावर, पश्चिम बंगालमधील खरगपूर –  बालासोर रस्ता,खरगपूर – केंझार रस्ता आणि पनागढ/केकेडी जवळ,तामिळनाडूमध्ये पुदुचेरी रस्त्यावर चेन्नई येथे, आंध्र प्रदेशात नेल्लोर – ओंगोले रस्ता  आणि ओंगोले – चिलाकलुरिपेट रस्ता , हरियाणातील मंडी डबवाली ते ओढन रस्त्यावर, पंजाबमधील संगरूरजवळ,गुजरातमधील भुज-नलिया आणि सुरत-बडोदा रस्त्यावर, जम्मू-काश्मीरमध्ये बनिहाल-श्रीनगर रस्त्यावर, आसाममधील लेह/न्योमा क्षेत्र आणि जोरहाट-बाराघाट रस्त्यावर,  शिवसागर जवळ , बागडोगरा-हाशिमारा रस्ता, हाशिमारा-तेजपूर मार्ग आणि  हाशिमारा-गुवाहाटी रस्ता या देशातील अन्य  19 ठिकाणी  आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठी ‘इमर्जन्सी लँडिंग’ सुविधा विकसित केल्या जातील.

 

आणीबाणीच्या स्थितीत विमान उतरविण्यासाठीच्या सुविधा अन्य 19 ठिकाणी विकसित करणार.

कोविनचे नवीन फिचर KYC-VS.

नो युवर कस्टमर्स /क्लायंट्स व्हॅक्सिनेशन स्टेटस.

KYC-VS मुळे एखाद्या व्यक्तीचे लसीकरण झाले आहे किंवा नाही हे कोविनच्या माध्यमातून समजेल.CoWIN launches new API

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी पासून कोविडविरोधी लसीकरण मोहीम सुरू केल्यापासून आत्तापर्यंत 72 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा वितरित करण्यात आल्या आहेत. लसीकरण केलेल्या व्यक्तीला लसीकरणाबाबत खात्री देणारे प्रमाणपत्र कोविनच्या माध्यमातून देण्यात येते.

हे प्रमाणपत्र स्मार्टफोन ,टॅबलेट, लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर डिजिटली कायमस्वरूपी ठेवता शकते त्याच प्रमाणे हे प्रमाणपत्र डीजी-लॉकर मध्ये साठवून लसीकरणाचा पुरावा म्हणून केव्हाही सादर करता येऊ शकते.

 

कोविनचे नवीन फिचर KYC-VS

अकाउंट अग्रीगेटर- अर्थात आर्थिक डेटा सामायिकीकरण यंत्रणेविषयी सर्व काही जाणून घ्या.

गेल्या आठवड्यात भारताने अकाउंट अग्रीगेटर ( Account Aggregator ) अर्थात  AA या  यंत्रणेचा प्रारंभ केला. या यंत्रणेमार्फत आर्थिक डेटा सामायिक केला जाईल. यामुळे गुंतवणूक व पतपुरवठ्यात क्रांतिकारी बदल घडून येतील, लाखो उपभोक्त्यांना स्वतःच्या आर्थिक नोंदी अर्थात रेकॉर्ड्स विषयी जाणून घेता येईल, त्यावर नियंत्रण ठेवता येईल, आर्थिक मध्यस्थ कंपन्या तसेच कर्जदात्यांसाठी संभाव्य ग्राहकांच्या माहितीचा मोठा साठा उपलब्ध होईल. अकाउंट अग्रीगेटर मुळे व्यक्तींना आजपर्यंत बंदिस्त राहिलेल्या त्यांच्या वैयक्तिक आर्थिक डेटावर नियंत्रण ठेवता येईल.

मुक्त बँकिंग व्यवहाराच्या दिशेने हे भारताचे पहिले पाऊल आहे. यामुळे लाखो उपभोक्त्यांना त्यांचा आर्थिक डेटा डिजिटली मिळवता येईल,व सुरक्षित रित्या , कार्यक्षम पद्धतीने  तो विविध संस्थांशी सामायिक करताही येईल.

बँकिंग व्यवस्थेतील ही अकाउंट अग्रीगेटर यंत्रणा भारतातील सर्वात मोठ्या आठ बँकांमध्ये सुरु करण्यात आली आहे. यामुळे कर्ज घेण्याची तसेच अर्थव्यवस्थापनाची प्रक्रिया खूप गतिमान व स्वस्त होऊ शकेल.

अकाउंट अग्रीगेटर- अर्थात आर्थिक डेटा सामायिकीकरण

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *