भारतीय निवडणूक आयोगाने सुगम निवडणुका यावर आयोजित केली राष्ट्रीय परिषद.
धोरणात्मक ढाचा अधिक सुटसुटीत करण्याच्या मार्गावरही झाली चर्चा.
भारतीय निडणूक आयोगाने सुगम निवडणुका 2021 या विषयावर आज दुरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले. सध्याच्या सुलभ धोरणांचा आढावा आणि निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने आजचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक अधिकारी,दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरी संस्था आणि सरकारी मंत्रालये आणि संस्था यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
निवडणुका अधिक समावेशक, सुलभ आणि दिव्यांगासाठी मतदार स्नेही करण्याच्या निवडणूक आयोगाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी केला.मतदार या सर्वप्रथम संबंधीतांची निर्णय घेण्याची भूमिका आयोगासाठी मोलाची असून निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगासह सर्व मतदार महत्वाची भूमिका बजावू शकतात आणि त्यांनी ही भूमिका बजावावी असे ते म्हणाले. दिव्यांग व्यक्ती आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी दिलेली मोलाची माहिती आणि सूचना, निवडणूक प्रक्रियेची प्रत्येक पावलावर समावेशकता आणि सुलभता वाढावी यासाठीची मार्गदर्शक तत्वे आखताना नक्कीच विचारात घेतल्या जात असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा समावेश करण्यावर भर देणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठरावाप्रती निवडणूक आयोगाच्या कटीबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दिव्यांगांसाठी मतदानाचा अनुभव सुखकर राहण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर असून दिव्यांगाना विना अडथळा मतदानाचा अनुभव घेता यावा यासाठी रॅम्प,व्हीलचेअर आणि पुरेश्या संख्येने स्वयंसेवक असल्याचे ते म्हणाले.
या परिषदेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांच्या सह निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांनी जारी केलेले साहित्य याप्रमाणे –
- अडथळे दूर करणे- सुलभ उपक्रम 2021. दिव्यांग मतदारांना सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने कल्पक आणि सुगम उपक्रम यांचे संकलन करणारी पुस्तिका.
- मतदार मार्गदर्शक,नव्या मतदारांना पत्र,मतदार जागृती पर प्रोत्साहनात्मक 50 गाण्यांची पुस्तिका यासारखे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या उपक्रमांची ब्रेल लिपीतली आवृत्ती
- मतदार हेल्पलाईन ऐप आणि इव्हीएम- व्हीव्हीपॅट या दोन व्हिडीओची सांकेतिक भाषेतली आवृत्ती.
नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्यात निवडणूक आयोगाच्या अनुभवासह आयोगाने हाती घेतलेले सुगम उपक्रम यावेळी सामायिक करण्यात आले.