भांडारकर स्मृती पुरस्कार डॉ.गो.बं.देगलूरकर यांना प्रदान होणार.

भांडारकर स्मृती पुरस्कार डॉ.गो.बं.देगलूरकर यांना येत्या शुक्रवारी प्रदान होणार

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रतिवर्षी प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील विद्वानास भांडारकर स्मृती पुरस्कार या वर्षापासून दिला जाणार आहे. हा पहिला पुरस्कार ख्यातनाम पुरातत्त्वज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर यांना येत्या शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रोजी सायं. ६ वाजता केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा कार्यक्रम होणार असून यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि संस्थेचे अध्यक्ष अभयजी फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आज येथे सांगितले.

या पुरस्काराची घोषणा संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली होती. एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि भांडारकरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. सदरचा कार्यक्रम संस्थेच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *