आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात नियामक परिषद सदस्य म्हणून क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांची नियुक्ती.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र अधिनियम, 2020 मधील कलम क्रमांक 23 मध्ये नियामक परिषदेबाबत तरतूद असून नियमातील पोटकलम (4) च्या अनुषंगाने शासनाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्रच्या नियामक परिषद सदस्य म्हणून क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांची नियुक्ती करण्याबाबत शासनस्तरावर मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेशकुमार बागुल यांनीदिली.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्रच्या नियामक परिषद साठी नियुक्त केलेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री. हेन्री मेनेझिस, श्री.राहूल बोस, डॉ.विद्या येरवडेकर, प्रा.रत्नाकर शेट्टी, डॉ.अंजली ठाकरे, श्री. निलेश कुलकर्णी, श्रीमती अंजली भागवत, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होऊन त्या अनुषंगाने राज्यात मुबलक प्रमाणात दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे यासाठी आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्मीतीचा उद्देश आहे.