प्राप्तिकर विभागाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापे.

Income Tax

प्राप्तिकर विभागाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापे.

प्राप्तिकर विभागाने 23-सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील जालना स्थित चार मोठ्या स्टील रोलिंग कारखान्यांच्या एका समूहाशी संबंधित विविध स्थळांवर छापे आणि जप्तीची कारवाई केली. या सर्व कंपन्या स्टीलचे टीएमटी बार्स आणि बिलेट्स म्हणजेच छर्रे बनवण्याच्या उद्योगात आहेत. जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

Income Tax
Image Source: Pix4Free.org

या कारवाई दरम्यान, अधिकाऱ्यांना गैरव्यवहारांना दुजोरा देऊ शकतील असे पुरावे असलेले असलेली अनेक कागदपत्रे, सुटे कागद आणि इतर डिजिटल पुरावे सापडले  असून हे सर्व पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या कागदपत्रांवरुन या कंपन्या खूप मोठ्या बेहिशेबी आर्थिक व्यवहारात गुंतल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. यातील अनेक व्यवहारांची कुठल्याही अधिकृत कागदपत्रांवर नोंद नाही. या ठिकाणी आढळलेल्या इतर पुराव्यांनुसार, या कंपन्यांनी बनावट कंपन्या आणि शेयर प्रीमियमच्या माध्यमातून केलेला बऱ्याच मोठ्या बेहिशेबी रकमेचा गैरव्यवहार देखील समोर आला आहे. सुमारे 200 कोटी रुपयांची अतिरिक्त खरेदी लक्षात आली असून, हिशेब नसलेला बराच मोठा मालही कारखाना परिसरात सापडला आहे.

12 बँक लॉकर्स उघडकीस आणले गेले. त्याशिवाय, 2.10 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम, 1.07 कोटी रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची बेहिशेबी मालमत्ता समोर आली असून चार कंपन्यांचे 71 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न असल्याचेही तपासात आढळले आहे. या प्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *