बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे येथील प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन.

बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे येथील प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता 6 ऑक्टोबर 2021 सकाळी 8 वाजता वार्म अप ट्रॅक मैदान श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल म्हाळुंगे येथे क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील ८ ते १४ आणि १० ते १४ वयोगटातील मुलांसाठी ॲथलेटिक्स, बॉक्सींग, कुस्ती, तलवारबाजी व वेटलिफ्टींग आणि८ ते १२ या वयोगटातील मुलांसाठी डायव्हिंग खेळासाठी क्रीडा नैपुण्य चाचण्या घेण्यात येणार आहे. खेळाडूचे वय 1 जानेवारी 2022 रोजी ८ ते १४ वर्ष असणे आवश्यक राहील यांची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी शिवाजी कोळी (७०२०३३०४८८), जयकुमार टेंभरे (९९६०३४३४०४), जगन्नाथ लकडे, (९४२३२५११६०), दादासाहेब देवकते (९९२३९०२७७७) यांचेशी संपर्क साधवा.

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये व खेळाडू यांनी संधीच लाभ घ्यावा व कोरोना प्रतिबंधक नियमावलीनुसार सामाजिक अंतराचे पालन करुन व मास्क सॅनिटायझर इत्यादी साहित्यासह खेळाडूंनी विहित वेळेत चाचणीस्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेशकुमार बागुल यांनी केले आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *