जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान नियोजन समितीची बैठक संपन्न.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात 1 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे जिल्ह्यातील अभियानाच्या नियोजनासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान नियोजन समितिच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक आणि विशष कार्य अधिकारी यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक डी कार्तिकेयन, जिल्हा प्रशासन अधिकारी तथा स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी चंद्रकांत खोसे व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानात जिल्हा प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या प्रत्येक दिवशी जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेबरोबरच ग्रामीण भागात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.