सध्या 55 आधार सेवा केंद्र कार्यरत; आतापर्यंत 70 लाख लोकांना देण्यात आली सेवा.

Aadhaar Card हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

युआयडीएआयची देशभरातील 122 शहरांमध्ये 166 स्वतंत्र आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडण्याची योजना.

सध्या 55 आधार सेवा केंद्र कार्यरत; आतापर्यंत 70 लाख लोकांना देण्यात आली सेवा.Aadhaar is the largest biometric identification scheme in the world.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने देशभरातील 122 शहरांमध्ये 166 स्वतंत्र आधार नावनोंदणी आणि अद्ययावत केंद्रे उघडण्याच्या योजनेचा भाग म्हणून 55 आधार सेवा केंद्र (एएसके) सुरु केले आहेत. हे बँका, टपाल कार्यालये आणि राज्य सरकारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुमारे 52,000 आधार नोंदणी केंद्रांव्यतिरीक्त आहेत. मुंबईतील कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे : तळमजला, जी-06, एनआयबीआर  कॉर्पोरेट पार्क, 1 एअरोसिटी, सेफेडपूल, साकिनाका, मुंबई.

हे एएसके आठवड्याचे सर्व दिवस खुले आहेत, त्यांनी आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींसह 70 लाखांहून अधिक रहिवाशांना मदत केली आहे.

या केंद्रांमध्ये मॉडेल-ए एएसकेमधे दररोज 1,000 नावनोंदणी आणि विनंतीअर्ज अद्ययावत करण्याची क्षमता आहे, मॉडेल बी एएसकेमधे दररोज 500 पर्यंत नावनोंदणी आणि विनंतीअर्ज अद्ययावत करणे, मॉडेल सी एएसकेमधे दररोज 250 नावनोंदणी आणि विनंती अद्ययावत करण्याची क्षमता आहे. हे एसके सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत कार्यरत असतात. ते फक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. आधार नोंदणी विनामूल्य आहे, लोकसंख्याशास्त्रीय अद्यतनांसाठी नाममात्र 50 रुपये तर बायोमेट्रिक अद्यतनांसाठी लोकसंख्याशास्त्रीय 100 रुपये आकारले जातात.

आधार सेवा केंद्रात रहिवाशांना नावनोंदणी/अद्ययावत प्रक्रियेच्या संबंधित टप्प्यावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टीम आणि टोकन व्यवस्थापन प्रणाली मार्गदर्शन करते.

ही केंद्रे वातानुकूलित आहेत तसेच आसन क्षमता पुरेशी असून आणि दिव्यांगांसाठी खूपच सोयीची आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *