केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी सेवेद्वारे 1.3 कोटी लोकांनी आरोग्यविषयक सल्ला सुविधेचा लाभ घेतला.
सुमारे 90,000 रुग्ण दररोज ई-संजीवनी सुविधेचा वापर करत आहेत.
2022 सालापर्यंत आयुष्यमान भारत- आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र संलग्न ई-संजीवनी सुविधेच्या अंमलबजावणीची कार्यकक्षा वाढवून 1 कोटी 55 लाख आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांना या उपक्रमाअंतर्गत जोडणार.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ई-संजीवनी उपक्रमाने आज आरोग्यविषयक 1 कोटी 30 लाख सल्ले देण्याचा टप्पा पूर्ण केला. ई-संजीवनी हा भारत सरकारचा आरोग्यविषयक सल्ला उपलब्ध करून देणारा टेलीमेडिसिन उपक्रम आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील डिजिटल मंच म्हणून हा उपक्रम हळूहळू भारतीय आरोग्य सेवा वितरण क्षेत्राला समांतर आरोग्यविषयक सेवा सुविधा म्हणून आकाराला येत आहे. आज सुमारे 90,000 रुग्ण दररोज ई-संजीवनी मंचाचा वापर करत आहेत. ई-संजीवनी मंचाचे दोन प्रकार कार्यरत आहेत- एक म्हणजे डॉक्टर ते डॉक्टर चर्चा आणि सल्ला सेवा तर दुसरा म्हणजे रुग्ण ते डॉक्टर सल्ला सेवा. या दोन्ही प्रकारांच्या वापरातून संपूर्ण देशभरात दुर्गम भागात देखील आरोग्याबाबत सल्ला मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोव्हेंबर 2019 मध्ये सुरु केलेल्या आयुष्यमान भारत-आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र संलग्न ई-संजीवनी सुविधेअंतर्गत केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतून डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात ‘हब अँड स्पोक’ धर्तीवर 1,55,000 आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या 27,000 आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांमध्ये आयुष्यमान भारत- आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र संलग्न ई-संजीवनी सुविधा उपलब्ध आहे आणि त्यांना परिसरातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये इत्यादी 3000 केंद्रांतून सेवा दिली जाते.
देशभरात (13411325) ई-संजीवनी सेवा केंद्रे उभारून त्यांची सेवा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आघाडीवर असलेली 10 राज्ये आणि या राज्यांमध्ये असलेली एकूण ई-संजीवनी सुविधा केंद्रे कंसात दिली आहेत. महाराष्ट्र (403376), गुजरात (485735), आंध्रप्रदेश (4223054), कर्नाटक (2415774), तामिळनाडू (1599283), उत्तर प्रदेश (1371799), मध्य प्रदेश (447878), बिहार (436383), पश्चिम बंगाल (369441), आणि उत्तराखंड (271513).