आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडीं.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती.Covid-19-Pixabay-Image

गेल्या 24 तासात 72,51,419 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 91 (91,54,65,826) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,   88,75,020 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 29,639 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,31,50,886  झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.93% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 100 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 18,346 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,52,902 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.75% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 201 दिवसातील निचांकी आहे. देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,41,642  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 57.53 (57,53,94,042) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.66% असून गेल्या 102 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.61% असून गेले सलग 36 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 119 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

इतर अपडेट्‌स:-

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *