खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

Higher and Technical Education Department Govt of Maharashtra

उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन.Higher and Technical Education Department Govt of Maharashtra

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदविका व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी THE (Times Higher Education) /QS (Quacquarelli Symonds) Ranking २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा २० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता online पध्दतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावरून सुरु करण्यात आलेली आहे.

तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील वर्ष २०२१-२२ करीता अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. मात्र अशा विद्यार्थ्यापैकी ज्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ( प्रथम वर्ष) वगळता पुढील अभ्यासक्रमाच्या मान्य कालावधीसाठी शिष्यवृत्ती देय राहील. या योजनेच्या लाभासाठी उमेदवारांच्या व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रुपये ८.०० लाख इतकी करण्यात आलेली आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.foreignscholarship२०२१.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर online पद्धतीने अर्ज भरावयाचा असून अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच उमेदवारांनी online भरलेल्या अर्जाची प्रत मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांच्य साक्षांकित प्रतिसह पडताळणीसाठी विभागीय सहसंचालक यांचे कार्यालयात २० ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे, असे सहसंचालक उच्च शिक्षण, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *