बॉम्बे सॅपर्सने विजय मशालीचे स्वागत केले.

BOMBAY SAPPERS HOST VICTORY FLAME

बॉम्बे सॅपर्सने विजय मशालीचे स्वागत केले.BOMBAY SAPPERS HOST VICTORY FLAME

1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वर्णिम विजय वर्ष विजय मशालीचे  9 ऑक्टोबर 2021 रोजी बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर इथे  भव्य स्वागत करण्यात आले. 1971 च्या युद्धातील माजी सैनिक , वीर नारी आणि सेवेतील अधिकाऱ्यांनी  या केंद्राच्या परेड मैदानावर विजय मशालीचे समारंभपूर्वक स्वागत केले. भांगडा आणि झांज सादरीकरणासह औपचारिक मानवंदना दिल्यानंतर दक्षिण कमांडच्या  आर्मी कमांडरानी विजय मशालीचे स्वागत केले. बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटरने मोटरसायकल डिस्प्ले आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एएससी सेंटर, बंगलोर येथील टोर्नाडोज संघाने कौशल्य आणि अचूकतेचे दर्शन घडवले तसेच मलखांब, गटका आणि मार्शल आर्ट सारखे पारंपारिक खेळ बॉम्बे सॅपर्स द्वारे दाखवण्यात आले.  लेफ्टनंट जनरल जेएस नैन, एव्हीएसएम, एसएम, जीओसी-इन-सी, सदर्न कमांड यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी 1971 च्या भारत – पाकिस्तान युद्धात माजी सैनिकांनी दिलेल्या  अमूल्य योगदानाचा गौरव  केला.

10 ऑक्टोबर 2021 रोजी, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटरने छावणी परिसरात आणि आळंदी – दिघी मार्गालगत धावपटू आणि घोडेस्वारांसह दिमाखात रॅली काढून विजय मशाल दिघी हिल्स इथल्या आपल्या दुसऱ्या छावणीत नेली. दीघी छावणीत विजय मशालीचे स्वागत केल्यानंतर बॉम्बे सॅपर्सच्या माजी सैनिकांचा बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटरच्या कमांडंट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *