आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन.

आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन.

पुणे : लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार आंबेगाव पंचायत समितीच्या नूतन सुसज्ज इमारतीतून व्हावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घोडेगाव येथे सार्वजनिक सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. Deputy Chief Minister Ajit Pawar at Ambegaon Panchayat Samiti

आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
आंबेगाव पंचायत समितीची नवी इमारत देखणी व शहराच्या वैभवात घर घालणारी आहे. या इमारतीच्या फर्निचरसाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे, लवकरच फर्निचरचे काम पूर्ण होईल. नागरिकांचे प्रश्न तेवढ्याच तत्परतेने सोडवले गेले पाहिजेत. या इमारतीतून होणारा प्रत्येक निर्णय सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांच्या विकासाला चालना देणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आंबेगाव व परिसरातील आरोग्य, ग्रामविकास,ऊर्जा आदिवासी विकास, जलसंपदा, पर्यटन विभागाशी संबंधित प्रश्नाबाबत आपण पाठपुरावा करणार असून भीमाशंकर विकास आराखड्याबाबत लवकरच बैठक घेत विकास आराखड्याला गती देण्यात येईल. जिल्ह्यात रस्ते विकासाचे अनेक कामे होत आहेत, या भागातून त्यातील अनेक रस्ते जाणार आहेत. त्यामुळे परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचेही यावेळी उदघाटन करण्यात आले. श्री.पवार यांनी शाळेची पाहणी करून सोईसुविधायुक्त शाळेचा या भागातील विद्यार्थ्यांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी शाळेबाबत सविस्तर माहिती दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *