भारतीय संस्कृती आणि परंपरांची तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्याची गरज.

भारतीय संस्कृती आणि परंपरांची तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर

भारताच्या प्राचीन परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि ‘विविधतेमध्ये एकता’ हे  आपले राष्ट्रीय मूल्य कायम जपण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज केले. समाजातील विविध सामाजिक विभागणी पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य भारताच्या बहुविध संस्कृतीत आहे, असे ते म्हणाले.

हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी दसरा उत्सवाचा भाग म्हणून  हैदराबाद येथे आयोजित केलेल्या, ‘अलाई बलाई’ या सांस्कृतिक कार्यक्रमात नायडू बोलत होते.

या कार्यक्रमात नायडू यांनी ,स्वातंत्र्य  चळवळीदरम्यान लोकांना एकत्र आणण्यासाठी  गणेश चतुर्थी उत्सव साजरा करणारे महान स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या वारशाचे स्मरण केले. आपल्या महान नेत्यांनी दिलेल्या वारशाचा आदर बाळगण्याचे  आणि भारताच्या बहुविध  संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी या नेत्यांच्या  जीवनापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *