तुम्हाला वाटते की तुमच्या कल्पनांमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे? तर युरेका! 2021 वर आत्ताच नोंदणी करा !
https://eureka.ecell.in/ वर युरेका 2021 साठी नोंदणी खुली आहे!
80 लाख रुपये किमतीची बक्षिसे असलेल्या बिझनेस मॉडेल स्पर्धा युरेकासाठी आयआयटी मुंबईचा ई-सेल अर्ज मागवत आहे.
ना नफा तत्त्वावरील आयआयटी मुंबईचा उद्योजकता कक्ष (सेल), उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवतो. ई-सेल आयआयटी मुंबईची बिझनेस मॉडेल स्पर्धा युरेका! हा एक असा उपक्रम आहे जो स्टार्टअपना सर्वोत्तम ठिकाणी पोहोचण्यासाठी संधी प्रदान करतो आणि देशात प्रभाव निर्माण करू शकतो. युरेका! 2021 साठी https://eureka.ecell.in/. यावर नोंदणी करू शकता. विजेत्यांना एक्सपो 2020 दुबईमध्ये कल्पना मांडण्याच्या संधीसह 80 लाख रुपयांची बक्षिसे आहेत.
युरेका स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्टार्टअप्सना मार्गदर्शन, निधी, इन्क्युबेशन, नेटवर्किंग आणि इतर अनेक संधी प्राप्त होतील. वर्षभराची टाळेबंदी आणि व्यवसायावरील निर्बंध यामुळे समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विविध क्षेत्रांतील या समस्यांचे सर्वोत्तम निराकरण करण्यासाठी आणि समाजातील समस्या सोडवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेला आधार प्रदान करण्याची कल्पना म्हणजे युरेका!
या वर्षी, स्पर्धा 7 वेगवेगळ्या विभागात विभागली गेली आहे:
- सेल्स्केन व्यवसाय विभाग: युरेकाचा महत्वाकांक्षी विभाग!, व्यवसाय विभागाचा उद्देश आहे की जगात क्रांती करण्याची क्षमता असलेल्या व्यवसायांमध्ये कल्पना विकसित करण्यात मदत करणे.
- स्वावलंबन सिडबी सामाजिक विभाग: सामाजिक विभाग हा अशा कल्पना आणि बी मॉडेलला प्रोत्साहन देतो जे तळागाळातील लोकांच्या गरजा पूर्ण करतात आणि समाजाचे अधिक भले करू शकतात.
- एसबीआय जनरल फिनटेक विभाग: फिनटेक विभागात तंत्रज्ञानातील प्रगती आणि व्यवसाय मॉडेलमध्ये बदल समाविष्ट आहेत ज्यात नाविन्यपूर्ण साधने, चॅनेल आणि सिस्टम्सच्या विकासाद्वारे आर्थिक सेवांच्या तरतुदीमध्ये बदल करण्याची क्षमता आहे.
- शेल शाश्वत आणि किफायतशीर ऊर्जा विभाग: शाश्वत आणि किफायतशीर ऊर्जा विभाग स्वच्छ उर्जा उद्दिष्टांच्या दिशेने काम करणाऱ्या आणि पारंपारिक इंधनांना पर्याय प्रदान करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देतो.
- गोदरेज अॅग्रोव्हेट फूड अँड अॅग्रो विभाग: फूड अँड अॅग्रो विभागाचा उद्देश अन्न आणि कृषी उद्योग क्षेत्रातील नवोन्मेषाला समर्थन देणे हा आहे. जंक फूड खाण्याचा आनंद कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना सहस्राब्दी पिढी निरोगी खाण्याच्या सवयींकडे वळत असल्याने या क्षेत्रात बरीच क्षमता आहे.
- वेस्टब्रिज कॅपिटल पॅन-आयआयटी विभाग: पॅन-आयआयटी विभाग 23 भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) कोणत्याही विद्यार्थ्यांनी किंवा माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या स्टार्टअपमधून नोंदी आमंत्रित करतो.
- गल्फ इस्लामिक इन्व्हेस्टमेंट्स एड्यूटेक विभाग: महामारी शिक्षण व्यवस्थेसह संपूर्ण जग हादरवून टाकत असताना, केवळ तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्याऐवजी डिजिटल मोडमध्ये संक्रमण ही एक पूर्णपणे गरज बनली आहे. शिक्षण आणि नावीन्यपूर्ण उत्कृष्टता हा या विभागाचा गाभा आहे.
उद्योजकता कक्ष, आयआयटी मुंबई विषयी: 1998 मध्ये 50,000 रुपयांच्या बक्षिसांच्या रकमेने सुरवात झालेल्या युरेका स्पर्धेने दरवर्षी 10,000 हून अधिक नोंदी मिळवत आशियाची सर्वात मोठी व्यावसायिक मॉडेल स्पर्धा बनण्यासाठी झपाट्याने प्रगती केली आहे. युरेका मुळे अनेक स्टार्टअप! बहु-दशलक्ष डॉलरचे उद्योग बनले आहेत. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ई-सेल आयआयटी मुंबईला युनेस्को, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडियाचे योगदान मिळाले आहे. ई-सेल आपल्या विविध उपक्रमांद्वारे गेल्या 22 वर्षांपासून स्टार्टअप परिसंस्थेच्या विविध घटकांमधील दुवा म्हणून काम करत आहे. ई-सेलच्या कार्यक्रमांना श्री ट्रॅविस कलानिक (मुख्य कार्यकारी अधिकारी, उबर), सुश्री अरुंधती भट्टाचार्य (माजी अध्यक्ष, एसबीआय), श्री दीपक पारेख (अध्यक्ष, एचडीएफसी), श्री अमिताभ कांत (मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग), श्री. नंदन निलेकणी (माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, इन्फोसिस), श्री दिव्यांक तुरखिया (संस्थापक, Media.net) वक्ते म्हणून लाभले आहेत.