राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठक संपन्न.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठक संपन्न.

पुणे – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या अध्यक्षेतखाली संपन्न झाली.

तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. शालेय विद्यार्थ्यांना याविषयी माहिती देण्यात यावी. समाज माध्यमांसह अन्य माध्यमांचा उपयोग करून जनजागृतीवर भर द्यावा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे श्री.खराडे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. कार्यक्रमाबाबत 19 प्रशिक्षण घेण्यात आले असून यावर्षी 607 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी पोलिसांनी 3 कोटी 78 लक्ष 53 हजार रुपयांचा गुटखा आणि 9 लाख 83 हजार रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले असून चार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने 3325 किलोग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *