फिट इंडिया प्लॉग रनसह देशव्यापी स्वच्छ भारत मोहिमेचा समारोप.

The Fit India Plog Run

फिट इंडिया प्लॉग रनसह देशव्यापी स्वच्छ भारत मोहिमेचा समारोप; 500 सहभागींकडून150 किलो कचरा संकलित.

फिट इंडिया चळवळीचा एक भाग म्हणून राष्ट्रीय राजधानीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये रविवारी  सकाळी फिट इंडिया प्लॉग रन हा वार्षिक देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तंदुरुस्ती आणि स्वच्छतेचा मेळ घालणारी प्लॉगिंग म्हणजेच जॉगिंग अर्थात धीम्या गतीने धावताना कचरा उचलणे  ही एक अनोखी  क्रिया आहे. ज्यामध्ये सहभागी जॉगिंग करताना कचरा गोळा करतात.The Fit India Plog Run

500 हून अधिक खेळाडू आणि प्रशिक्षक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव आणि आर्थिक सल्लागार श्री. मनोज सेठी, क्रीडा विभागाचे सहसचिव श्री एल एस सिंह, फिट इंडियाच्या अभियान संचालिका श्रीमती एकता विश्नोई आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. कचरामुक्त भारतासाठी सातत्यपूर्ण मोहिम राबवणारे म्हणून ओळख असणारे रिपुदमन बेवली यांनी सहभागी म्हणून फिट इंडिया प्लॉग रनचे नेतृत्व केले. यावेळी सहभागिंनी जॉगिंग करताना कचरा गोळा केला.1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा समारोपही आजच झाला.

या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करताना श्री एल एस सिंह म्हणाले,”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग असलेल्या प्लॉग रनमध्ये आज अनेक तरुण मुले-मुली सहभागी होताना पाहणे विलक्षण आहे.

हा उत्साह  आपल्याला एकाचवेळी आपला देश स्वच्छ करण्यासाठी आणि आपले नागरिक तंदुरुस्त होण्यासाठी खूप पुढे घेऊन जाईल.”

भारताचे प्लॉगमन म्हणून ओळखले जाणारे रिपुदमन,यांनी दिवसाच्या  सुरुवातीला 500 सदस्यांच्या गटाला सराव व्यायामासह मार्गदर्शन केले आणि शेवटी सहभागींना प्लास्टिक मुक्तीची  प्रतिज्ञा दिली.

प्लॉग रन सारखा भव्य उपक्रम राबवल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. गेल्या काही वर्षांत देशभरात लाखो लोकांनी स्वयंसेवक म्हणून सेवा दिली आहे.  आज, आम्ही सर्वांनी मिळून  सुमारे 150 किलो कचरा उचलला. दोन वर्षांच्या कालावधीत, मी ही चळवळ देशातील सर्व 720 जिल्ह्यांमध्ये नेण्याची तसेच सर्वत्र इको फिटनेस क्लब आणि फिट इंडिया क्लब तयार करण्याची योजना आखत आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कार्यक्रमातील सहभागींनी एकतेची शपथही घेतली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *