रेल्वे मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने संपूर्ण रेल्वे परिसरामध्ये निर्माण केली एकात्मिक एक खिडकी चित्रीकरण यंत्रणा.
रेल्वेमध्ये चित्रीकरण सुलभतेने करण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये (एनएफडीसी) चित्रपट सुविधा कार्यालय (एफएफओ) स्थापन करण्यात आले आहे. संपूर्ण रेल्वे परिसरामध्ये सुव्यवस्थितपणे आणि प्रभावी चित्रीकरणासाठी परवानगी मिळविण्याच्या दृष्टीने, रेल्वे मंत्रालयाने एकात्मिक एक खिडकी चित्रीकरण यंत्रणा तयार केली आहे. रेल्वे हा नेहमीच भारताच्या चित्रपटसृष्टीच्या अनुभवाचा एक भाग राहिला आहे. अनेक चित्रपटात भारतीय रेल्वेचे अतिशय सुंदर दर्शन घडवण्यात आले आहे.
भारतातील चित्रीकरण सुलभ करण्यासाठी आणि जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून देशाचा प्रचार व्हावा यादृष्टीने, चित्रपट सुविधा कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातील चित्रीकरणासाठी एक खिडकी सुविधा आणि मंजुरी यंत्रणा तसेच एकाच ठिकाणी माहितीचे डिजिटल भांडार या कार्यालयाच्या संकेतस्थळावळ उपलब्ध आहे.
आत्तापर्यंत, रेल्वेमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानग्या मिळवण्याच्या अनुषंगाने, आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट निर्माते (आणि/किंवा त्यांचे प्रतिनिधी) 17 विभागीय रेल्वे आणि रेल्वे बोर्डाच्या (नवी दिल्ली) मुख्य जनसंपर्क अधिकार्यांच्या कार्यालयांना भेट देऊन अर्ज सादर करत असत. आता एफएफओ या वेब पोर्टलवर (www.ffo.gov.in ) एक खिडकी सुविधा सुरु केल्यानंतर, चित्रपट निर्माते केंद्रीकृत मार्गाने एकापेक्षा जास्त क्षेत्रीय रेल्वेच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या विविध रेल्वे स्थानकांवर चित्रीकरणासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज दाखल केल्यानंतर, विभागीय रेल्वेमधील संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले जाईल आणि ते एफएफओ पोर्टलवर अर्ज पाहून आणि मंजुरीच्या योग्य प्रक्रियेनंतर परवानग्या पोर्टलवर अपलोड करतील. चित्रीकरण परवानगीसाठी विनंती अर्जाची पारदर्शक आणि वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी अर्जासंबंधीच्या कोणत्याही शंका उपस्थित करणे आणि त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने हे पोर्टल अर्जदाराला तसेच परवानगी देणार्या अधिकार्यांना एक व्यासपीठ देखील प्रदान करते.
विविध ठिकाणी चित्रीकरणासाठी परवानग्या मिळवण्यासाठी निर्मात्यांना विविध ठिकाणी जाऊन परवानग्या घ्याव्या लागत ही संख्या कमी कमी करणे हा एकात्मिक एक खिडकी यंत्रणा सुरु करण्याचा उद्देश आहे. अर्जासंबंधी कोणत्याही शंका उपस्थित करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी. हे पोर्टल अर्जदाराला तसेच परवानगी देणार्या अधिकार्यांना एक व्यासपीठ देखील प्रदान करते. ही पारदर्शक यंत्रणा चित्रीकरणासाठीच्या परवानगीच्या विनंतीची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करेल.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनीत शर्मा म्हणाले, “भारतीय रेल्वेचा भारतीय चित्रपटांशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. आणि विविध चित्रपट, गाणी आणि माहितीपटांच्या चित्रीकरणासाठी भारतीय रेल्वेने नेहमीच पाठिंबा दिला आहे.भारतीय सिनेमाने रेल्वेला योग्य आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने चित्रपटांमध्ये प्रदर्शित करून यथायोग्य न्याय दिला आहे. ही नवीन यंत्रणा जगभरातील चित्रपट निर्मात्यांना सेवासुविधा देईल. रेल्वेच्या विविध आवारात चित्रीकरणासाठी चित्रपट निर्मात्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आम्ही स्वागत करतो आणि आशा करतो की, पटकथा आणि कथानकांमध्ये रेल्वे एक उत्साहपूर्ण रूपात वैशिष्ट्यपूर्ण ठरत राहील.”
या संदर्भात माहिती आणि प्रसारण सचिव श्री अपूर्व चंद्रा म्हणाले की, रेल्वेसारख्या विविध अधिकारक्षेत्रांमध्ये चित्रीकरण सुलभ करण्याच्या मार्गाने, “चित्रपट निर्मात्यांसाठी मूल्य निर्माण करण्याची ही कल्पना, अनोख्या, विशिष्ट स्थानी चित्रीकरण केल्यामुळे चित्रीकरण कथानक वाढवते. या उपक्रमाअंतर्गत विविध हितसंबंधीयांसोबत एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न आहे. रेल्वे हा भारताच्या चित्रपट इतिहासाचा नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि चित्रपट निर्मात्यांनी भारताच्या विस्तीर्ण आणि नयनरम्य रेल्वे नेटवर्कला त्यांच्या कथनात आणण्यासाठी या नव्याने निर्माण केलेल्या यंत्रणेचा फायदा घेतला पाहिजे.”
एफएफओ पोर्टल www.ffo.gov.in रेल्वेच्या वतीने चित्रपट, दूरचित्रवाणी /वेब शो आणि मालिकांसाठी अर्ज स्वीकारेल. माहितीपट/संगीत चित्रफीत आणि एव्ही जाहिरातींसाठी, निर्माते थेट रेल्वेकडे अर्ज करू शकतात.