जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु करावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु करावे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे.

यूपीएससी/ एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार.Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधन व प्रशिक्षणामध्ये काळानुरूप बदल करून नावीन्यपूर्ण संशोधन करावे, संशोधनाची व्याप्ती वाढवावी, प्रशिक्षण देताना ज्याप्रमाणे अमेरिका, चीन देशांमध्ये कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षणे राबविले जातात. त्याचधर्तीवर जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बार्टीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, दिव्यांग कल्याण आयुक्त श्री.ओमप्रकाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक न्यायमंत्री श्री. मुंडे म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज’ व महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक पाठबळ देऊन उच्च शिक्षणाकरिता संधी दिली व बाबासाहेबांनी त्यांच्या ज्ञानदानातून वंचित, दुर्लक्षित घटकास मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आदर्शवत जागतिक दर्जाचे असे संविधान निर्माण केले.

परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते आणि यावर्षी सामाजिक न्याय विभागामार्फत सर्वच्या-सर्व 75 विद्यार्थ्याच्या जागा भरलेल्या आहेत. त्यात यावर्षी पन्नास विद्यार्थ्यांची वाढ करत सव्वाशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे आणि आगामी काळात ही संख्या दोनशे पर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने पुण्यात सैनिकी शाळा सुरु करण्याकरिता प्रयत्नशील आहोत असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांकरीता आणखी स्वाधार योजनेत बदल करण्यात येऊन तालुका स्तरावरील विद्यार्थी यांनाही त्याचा लाभ घेता येईल. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे पुणे येथे आणखी दोन वसतीगृह उभारणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यूपीएससी व एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. बार्टीने मदत केल्यामुळे आम्ही अधिकारी झालो असल्याचे सांगून त्यांनी बार्टीसाठी व समाजासाठी सोबत राहू असे सांगून आभार व्यक्त केले.

बार्टी व समाज कल्याण विभागातील कामकाजाचा आढावा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व समाज कल्याण विभागातील कामकाजाचा आढावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.

या आढावा बैठकीत बोलताना श्री धनंजय मुंडे म्हणाले, बार्टीच्या हडपसर येथील 60 एकर जागेवर जागतिक पातळीवरील उत्कृष्ट भव्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभे करणार असून, त्याची आराखडा तत्काळ सादर करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र या दोन्ही प्रक्रिया एकिकृत कराव्यात व पासपोर्टच्या धर्तीवर अत्याधुनिक करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

प्रास्ताविक बार्टीचे महासंचालक श्री.गजभिये यांनी केले, सूत्रसंचालन श्री.नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले तर आभार बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार यांनी मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *