लोटली आणि वेर्णा यांना प्रथम जोडणाऱ्या चौपदरी रस्ते प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, श्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यामध्ये वेर्णा येथे राष्ट्रीय महामार्ग -566 वरील लोटली गाव ते औद्योगिक विकास महामंडळ, वेर्णा या चौपदरी रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन केले.3.84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या माध्यमातून ही गावे प्रथमच थेट जोडली जाणार आहेत. हा रस्ता अंदाजे 184.05 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 7.32 किमी आहे, आणि हा रस्ता लोटलीपासून सुरु होऊन वेर्णा औद्योगिक महामंडळाच्या टायटन गेटपर्यंत जातो. या रस्त्यामुळे पोंडा ते मुरगाव हे अंतर 12 किलोमीटरने कमी झाले असून यामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे. लोटली ते टायटन गेट पर्यंतच्या संपूर्ण 7.32 किमी लांबी रस्त्याचा एकूण प्रकल्प खर्च रु. 229.85 कोटी रुपये आहे.
”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे.गोवा हे एक पर्यटन स्थळ आहे आणि ते जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व्हावे अशी माझी इच्छा आहे”, असे श्री नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. सर्व प्रकारचे प्रदूषण कमी होण्यास मदत होण्याच्या दृष्टीने .केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोवा सरकारला ‘विजेवर चालणारी सार्वजनिक वाहतूक’ या संकल्पनेवर काम करण्यास सांगितले.