Inauguration of Krishna Kovid Center by MLA Chetan Tupe.
Hadapsar MLA Chetan Tupe inaugurated the ‘Krishna Kovid Center’ set up by Barai Family and ISKCON Temple today. MP Supriyatai Sule attended the event via video conference. Dr. Pranjal Khewalkar was instrumental in setting up this center. Due to this, 100 oxygen beds have been added in the Hadapsar area. Hadapsar has become a corona hotspot and many people have lost their lives due to the non-availability of oxygen beds. Due to the increasing number of patients and insufficient beds, the Baraii family and Iscon Temple decided to start an oxygen bed covid center at Hadapsar.
As the second wave of Covid spread rapidly, such a hospital was desperately needed in the Hadapsar area. The Barai family has made a valuable contribution in this regard. Nitin Barai, Yash Barai, corporator Vaishalitai Bankar, corporator Yogesh Sasane, Dr. Mane, Dr. Tillekar, Pravin Bhosale, etc. were present on this occasion.
आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते कृष्णा कोविड सेंटरचे उद्घाटन.
बराई कुटुंबीय आणि इस्कॉन टेम्पल यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘ कृष्णा कोविड सेंटरचे’ उद्घाटन आज हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमास खासदार सुप्रियाताई सुळे व्हिडीओ कॉन्फरसन्च्या माध्यमातुन उपस्थित होत्या. हे सेंटर उभारण्यासाठी डॉ प्रांजल खेवलकर यांनी मोलाचे सहकार्य लाभले . या मुळे हडपसर परीसरात १०० ऑक्सिजन बेडची भर पडली आहे. रूग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या ऑक्सिजनबेड या कारणास्तव, बरई कुटुंब आणि आयकॉन टेम्पेल यांनी हडपसर येथे ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोविडची दुसरी लाट वेगाने पसरत असताना, अशा हॉस्पिटलची हडपसर भागात नितांत आवश्यकता होती. या परिस्थितीत बराई कुटुंबाने मोलाचे योगदान दिले आहे.
या वेळी नितीन बराई, यश बराई, नगरसेविका वैशालीताई बनकर, नगरसेवक योगेश ससाणे डॉ माने, डॉ टिळेकर, प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.
Awareness about cybersecurity is important – Prof. Dhananjay Bhavsar . Yashaswi Education Society’s IIMS conducts a webinar on ‘Cyber Security
May 5, 2021: Prof. Dhananjay Bhavsar appealed to all to be aware of cybersecurity by taking necessary measures. He was speaking as the keynote speaker at a webinar on ‘Cyber Security’ organized by the Yashaswi Education Society’s International Institute of Management Science (IIMS). Speaking at the occasion, he initially gave detailed information about various types of communication systems. Prof. Bhavsar also guided the students on how to use their own devices while using e-commerce, keeping difficult passwords, not sharing any kind of sensitive information, backing up important files.
Especially when using e-commerce, using only one’s own device, keeping difficult passwords, not sharing any kind of sensitive information, and keeping backup of important files. Bhavsar guided the students. On this occasion, Dr. Shivaji Mundhe, Director, IIMS, along with a large number of faculty and students participated in this webinar. Dr. Pushparaj Wagh acted as the coordinator of the webinar.
सायबर सुरक्षेबाबत सजगता महत्वाची- प्रा.धनंजय भावसार. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस तर्फे ‘सायबर सुरक्षा’ विषयावरील वेबिनार संपन्न.
५ मे २०२१ : सायबर सुरक्षेबाबत सर्वांनीच आवश्यक त्या उपाययोजना करून सजगता बाळगली पाहिजे असे आवाहन प्रा.धनंजय भावसार यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे ‘सायबर सुरक्षा’ या विषयावरील वेबिनारमध्ये मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीला विविध प्रकारच्या संप्रेषण (कम्युनिकेशन) प्रणाली बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
सायबर विश्वात वावरताना आपली अमूल्य माहिती सुरक्षित कशी राहिल, यासाठी संगणक प्रणालीमध्ये अँटी व्हायरसची असलेली आवश्यकता, यंत्रणेत वारंवार येणारे अडथळे, अनोळखी फाईल्सचा शिरकाव, सायबर हल्ला याबाबतही प्रा. भावसार यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. विशेषतः ई- कॉमर्सचा वापर करताना फक्त स्वतःचेच डिव्हाईस वापरणे,अवघड पासवर्ड ठेवणे, कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती शेअर न करणे, महत्वाच्या फाईल्सचा बॅक अप ठेवणे आशा उपाययोजनांबाबतही प्रा.भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांच्यासह अन्य अध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला. वेबिनारचे समन्वयक म्हणून डॉ. पुष्पराज वाघ यांनी काम पाहिले.
The Supreme Court disallows Maratha Reservation law for exceeding 50 percent of reservations; upholds Indra Sawhney, 102nd Constitutional Amendment.
“Exceeding the ceiling limit of 50 percent laid down by Indra Sawhney is violative of Articles 14 and 15,” the Court held.
The Supreme Court on Wednesday disallows the Maharashtra State Reservation for Socially and Educationally Backward Classes (SEBC) Act, 2018 which extends reservation to the Maratha community in public education and employment (Jaishri Laxmanrao Patil v. Chief Minister).
The Court said that there were no extraordinary circumstances to grant reservation to the Maratha community over and above the 50 percent ceiling on reservation prescribed by the Supreme Court in its 1992 judgment in Indra Sawhney v. Union of India.
“The 2018 Act as amended in 2019 granting reservation for Maratha community does not make out any exceptional circumstance to exceed the ceiling limit of 50 percent reservation,” the Court held.
५० टक्क्यांहून अधिक आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा नाकारला; इंद्र सावनी, १०२ वी घटनात्मक दुरुस्तीचे समर्थन.
“इंद्र सावनी यांनी ठरवलेल्या 50 टक्के मर्यादेची मर्यादा ओलांडणे हे कलम १४आणि १५ चे उल्लंघन करणारे आहे,” असे कोर्टाने सांगितले. मराठा समाजाला सार्वजनिक शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देणाs्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गीय (एसईबीसी) अधिनियम, २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी नाकारली (जयश्री लक्ष्मणराव पाटील विरुद्ध मुख्यमंत्री). कोर्टाने म्हटले आहे की, इंद्रा सावनी विरुद्ध भारत सरकार १९९२ च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ठरविलेल्या आरक्षणावरील ५० टक्क्यांपेक्षा जास्त मर्यादा मराठा समाजाला आरक्षण देण्याची कोणतीही विलक्षण परिस्थिती नव्हती. “२०१८ in मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या कायद्यातील सुधारणा कायद्यानुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक मर्यादा ओलांडण्यासाठी कोणताही अपवादात्मक परिस्थिती दर्शविली जात नाही,” असे कोर्टाने सांगितले.
Pune Municipal Corporation to set up seven oxygen projects, Work on the first phase of six and a half tonne projects started
Considering the shortage of oxygen, the Municipal Corporation is now in the process of setting up a project to generate 18.5 tons of oxygen. In the first phase, work of six and a half tonne projects has been started and after that projects of thirteen-tonne capacity have been planned. Covid patients are treated in a total of eight municipal hospitals, including the Jumbo Covid Center in the city. For this, Pune Municipal Corporation needs about 43 tons of oxygen every day. Apart from this, the administration is planning to set up Covid centers in some other places. It requires a total of about 50 tons of oxygen. Therefore, Pune Municipal Corporation is getting only 40 tons of oxygen. Against the backdrop of almost all the shortages of total oxygen required, the corporation is now in need. The administration, however, has actually taken up the task of setting up its own oxygen project.
Prashant Waghmare, Chief Engineer, Pune Municipal Corporation, said that considering the current shortage of oxygen, the Municipal Corporation has now undertaken the work of oxygen generation projects. Therefore, the problem of oxygen required by the municipal hospitals will be solved permanently. Through this the administration is now preparing for the third wave.
All oxygen generating projects will be set up in municipal hospitals. In the first phase of the project of six and a half tons, the work of the project of 3 tons in Dalvi hospital has reached the final stage. Apart from this, two projects of 1.5 tonnes at Naidu Hospital and 2 tonnes at Kovid Hospital at Baner are underway. In the second phase, At Baner S. No. 33 there are two projects of 5 tonnes and, another 1.5 tonnes at Naidu Hospital and 1.5 tonnes at Warje. These projects are expected to start in the next two to three months.
The project will cost around Rs 12.5 crore. The fund will be raised from the Municipal Corporation’s CSR, of which about Rs 1.5 crore will be raised from the Mayor’s Fund and the rest will be raised through CSR. For this, help has been received from REC Company in Delhi.
पुणे महापालिका उभारणार सात ऑक्सिजन प्रकल्प, पहिल्या टप्प्यातील साडेसहा टनाच्या प्रकल्पांचे काम सुरू
ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन, आता महापालिकेने तब्बल साडेअठरा टन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हाती आहे. त्यात पहिल्या टप्प्यात साडेसहा टनांच्या प्रकल्पांचे काम ने सुरू झाले असून त्यानंतर तेरा टन क्षमतेचे प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील जम्बो कोविड सेंटर सह महापालिकेच्या एकूण ‘आठ रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. त्यासाठी पुणे महापालिकेला जवळपास ४३ टन ऑक्सिजन दररोज लागत आहे. याशिवाय आणखी काही ठिकाणी प्रशासनाने कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी एकूण जवळपास ५० टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला जेमतेम ४० टनच ऑक्सिजन मिळत आहे. या लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनच्या जवळपास सगळ्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता पालिका गरज भागणार आहे. प्रशासनाने स्वतःचे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे मात्र, महापालिकेला प्रत्यक्षात काम हाती घेतले आहे.
पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, सद्य:स्थितीत ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन महापालिकेनेच आता ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात लागणारा ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. या माध्यमातून प्रशासन आता तिसऱ्या लाटेसाठी तयारी करीत आहे.
ऑक्सिजननिर्मितीचे सर्व प्रकल्प पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उभारले जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील साडेसहा टनांच्या प्रकल्पातील, दळवी रुग्णालयात ३ टनांच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय नायडू रुग्णालयात १.५ टन आणि बाणेर येथील कोविड रुग्णालयात २ टन अशा दोन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात बाणेर स. नं. ३३ येथे ५ टनांच्या दोन प्रकल्पांचा समावेश आहे, तर नायडू रुग्णालयामध्ये आणखी १.५ टन अणि वारजे येथे १.५ टन अशा दोन प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू होणार आहेत.
हे प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास साडेबारा कोटींचा खर्च येणार आहे. हा निधी महापालिका ‘सीएसआर’ मधून उभारणार आहे त्यामधील जवळपास दीड कोटींचा निधी महापौर निधीतून तर उर्वरित निधी हा ‘सीएसआर’च्या माध्यमातून उभारला जाणार आहे. त्यासाठी दिल्लीतील आरईसी कंपनीची मदत मिळाली आहे.
10 lakh 65 thousand 545 corona infected patients in the Pune division are cured. Corona affected 12 lakh 49 thousand 913 patients in the department
Divisional Commissioner Saurabh Rao
Pune, dt. 5: 10 lakh 65 thousand 545 corona infected patients in the Pune division have recovered and gone home and the number of corona infected patients in the division has increased to 12 lakh 49 thousand 913. The number of active patients is 1 lakh 60 thousand 614. A total of 23,754 patients died of coronary heart disease, with a mortality rate of 1.90 percent. The recovery rate in the Pune division is 85.25 percent, informed Divisional Commissioner Saurabh Rao.
Pune District:- Out of the total 8 lakh 76 thousand 461 patients affected by Corona in Pune district, 7 lakh 66 thousand 953 patients have recovered and gone home. The active patient is 95 thousand 923. A total of 13,585 patients with coronary heart disease have died. The mortality rate is 1.55 percent and the recovery rate is 87.51 percent
पुणे विभागातील 10 लाख 65 हजार 545 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ,विभागात कोरोना बाधित 12 लाख 49 हजार 913 रुग्ण
विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 5 : पुणे विभागातील 10 लाख 65 हजार 545 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 49 हजार 913 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 60 हजार 614 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 23 हजार 754 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 76 हजार 461 रुग्णांपैकी 7 लाख 66 हजार 953 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 95 हजार 923 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.51 टक्के आहे.
.