आपण वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचा ऐतिहासिक उच्चांकी टप्पा गाठला आहे – पीयूष गोयल.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री श्री पीयूष गोयल,म्हणाले ,की आपण वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचा ऐतिहासिक उच्चांकी टप्पा गाठत आहोत. आज (दिल्ली )येथे 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे (IITF ) उदघाटन करताना ते म्हणाले की, जागतिक पुरवठा साखळी राखण्यासाठी जगात सर्वत्र भारताला विश्वासार्ह जागतिक भागीदार मानले जात आहे.
श्री गोयल पुढे म्हणाले की, टाळेबंदी असूनही भारताने जागतिक समुदायाला सेवा सहाय्य पुरविण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. भारताने थेट विदेशी गुंतवणूकीचा (FDI) ऐतिहासिक उच्चांकही गाठला आहे.
प्रारंभीच्या 4 महिन्यांतील आतापर्यंतची सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक ( एफडीआय) गेल्या वर्षीच्या कालावधीपेक्षा ते 62% जास्त आहे. भारत पुनश्च आर्थिक वेग गाठत आहे, हे भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा ( IITF) दर्शवेल असेही ते म्हणाले.
श्री गोयल यांनी भारतातील पाच प्रमुख सूत्रांचा (व्यवस्थांचा) अनुक्रम सांगितला, तो म्हणजे अर्थव्यवस्था, निर्यात, पायाभूत सुविधा, मागणी आणि विविधता या आहेत. उत्तम पायाभूत सुविधा, मागणी आणि वाढ आणि विकासातील विविधता ही एका चांगल्या आणि नवीन भारताची आकांक्षा बनेल, असेही ते म्हणाले.
श्री गोयल म्हणाले की, आम्ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहोत, ज्यामध्ये 110 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आले आहेत. पुढील वर्षी 500 कोटींचे लसींच्या मात्रांचे उत्पादन केले जाईल आणि त्यापैकी 5 किंवा 6 लसी या भारतात निर्माण केल्या,ज्यात जगातील पहिली अनुनासिक लस आणि पहिली डीएनए लस यांचा समावेश आहे.
ते म्हणाले की या प्रदर्शनात 750 हून अधिक महिला/स्वमदत गट सहभागी झाले आहेत जे भारतातील नारी शक्तीची क्षमता प्रदर्शित करत आहेत.
श्री गोयल म्हणाले की, भारत जगातील उद्योग आणि सेवांचे केंद्र बनू शकतो. भारतीय उद्योग गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि अर्थव्यवस्थेचे टप्पे यांचे नवनवीन उच्चांक गाठू शकतो. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF) ‘लोकल गोज ग्लोबल’ आणि ‘मेक इन इंडिया’ फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.
श्री गोयल म्हणाले की, भारत 130 कोटी नागरिकांसह ‘विश्वास, साथ आणि प्रयास ’याचा अनुप्रयोग करत शिकत, लागू करत, विकासाच्या मार्गावर आत्मविश्वासाने पुढे जात आहे.