शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

PM Narendra-Modi-Shivshahir-Babasaheb

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.PM Narendra-Modi-Shivshahir-Babasaheb

विनोदबुद्धीने परिपूर्ण, विद्वत्ता आणि भारतीय इतिहासाचे समृध्द भांडार असलेले व्यक्तिमत्व असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल पुरंदरे यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमात पुरंदरे यांनी केलेले भाषण देखील पंतप्रधानांनी सर्वांसाठी सामायिक केले.

ट्विट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“मला या बातमीने झालेले दुःख शब्दातीत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या जगात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल त्यांचे आपण सदैव ऋणी राहू. त्यांनी केलेले इतर कार्य देखील आपल्या सदैव स्मरणात राहील.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे विनोदबुद्धी, विद्वत्ता आणि भारतीय इतिहासाचे समृध्द भांडार असलेले व्यक्तिमत्व होते. गेल्या अनेक वर्षांच्या काळात त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचा सन्मान मला मिळाला. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमात त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला होता.

बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या व्यापक कार्यामुळे सदैव आपल्यात जिवंत राहतील. या दुःखद प्रसंगी मी त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *