Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the measures including the corona outbreak situation in Pune.
Proper planning, taking into account the possibility of a third wave of corona
-Deputy Chief Minister Ajit Pawar.
- The state government is making efforts to expedite the immunization of corona
- In case of malpractice, take action against such hospitals if the bodies are found to be blocked from the bill.
- If children are infected, take all necessary measures to treat them
- Prepare health facilities with medicines, oxygen and ventilator beds, remedies
Pune, dt. 7: Considering the possibility of a ‘third wave’ of ‘corona’, the health department should be vigilant and make proper arrangements to provide necessary treatment to the children if they are affected in this wave, said Deputy Chief Minister and District Guardian Minister Ajit Pawar. Given to the administrative system today.
He was speaking at a review meeting on Corona’s situation and measures chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar at Council Hall in Pune. MP Girish Bapat, MP Shrirang Barne, Pune Mayor Murlidhar Mohol, Pimpri Chinchwad Mayor Usha alias Mai Dhore, MLA Sunil Tingre, MLA Ashok Pawar, MLA Sanjay Jagtap, MLA Atul Benke, MLA Madhuri Misal, MLA Mukta Tilak, MLA Siddharth Shirole, and divisional Commissioner Saurabh Rao, Yashada’s Director-General S. Mallinath Kalashetti, Director, Groundwater Survey Department, Chokkalingam, Vikram Kumar, Commissioner, Pune Municipal Corporation, Rajesh Patil, Commissioner, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Suhas Divase, Chief Executive Officer, PMRDA, Dr. Rajesh Deshmukh, Commissioner of Police Amitabh Gupta, Commissioner of Police Krishna Prakash, Special Inspector General of Police Manoj Lohia, District Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh, Chief Executive Officer of Zilla Parishad Ayush Prasad, Retired Director General of Health Dr. Subhash Salunke, District Surgeon Senior officers including Ashok Nandapurkar were present. Deputy Chief Minister Ajit Pawar inquired about the current status of Coronavirus in the Pune district, measures being taken by the administration, and vaccination.
Deputy Chief Minister Ajit Pawar said that in view of the Corona ban, the state government is making efforts to vaccinate citizens between the ages of 45 and 18 years. The funds required for this have been reserved. But the vaccine is currently available in limited quantities. Vaccination will be smooth when enough vaccines are available. Priority will be given to make the second vaccine available to the first vaccinated citizens, said Deputy Chief Minister Ajit Pawar.
He directed the relatives of all the patients not to demand Remedesivir injection while treating the patients of Corona and directed to take action against the guilty hospitals by investigating the hospitals which were committing malpractice in the case of Remedesivir. Besides, strict action should be taken against some hospitals if they are found with dead bodies for bills, said Deputy Chief Minister Ajit Pawar.
Restrictions have been imposed in the state to break the chain of corona infection. Citizens need to cooperate with the administration by following the rules on their own. He also appealed to the people to provide proper information to the citizens by coordinating the available beds with oxygen and ventilators. Under the National Food Security Scheme, free foodgrains are being distributed to the beneficiaries of Antyodaya and priority families to make food available to the needy during the Corona epidemic. Try to provide the benefit of this scheme to the needy families in the district, he added.
Deputy Chief Minister Ajit Pawar gave clear instructions to all government agencies to plan carefully to ensure that medical services are not inadequate for children in the third wave of the corona. He also said that necessary preparations should be made to provide medical services like enhancing health facilities, oxygen supply, bed availability, and remedial injection.
Mayor Murlidhar Mohol said that various measures are being taken on behalf of Pune Municipal Corporation for corona control. Oxygen beds, ICU beds are getting ready enough. He said that it was a matter of great relief that the number of active patients was decreasing and the number of patients recovering was increasing.
Mayor Usha alias Mai Dhore said planning needs to be done considering the possibility that children will be affected in the third wave.
MP Girish Bapat said proper planning is needed for corona preventive vaccination. The oxygen plant needs to stand up fast, which will help alleviate the oxygen shortage.
MP Shrirang Barne said a strict lockdown was required for the Corona ban. The availability of ventilator beds and oxygen beds should be planned for the general public.
MLAs Ashok Pawar, Sunil Tingre, Atul Benke, Sanjay Jagtap, Mukta Tilak, Madhuri Misal, MLA Siddharth Shirole also raised important issues.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा
-उपमुख्यमंत्री अजित पवार
- ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरण जलदगतीने होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील.
- रेमडेसीवीरबाबतीत गैरप्रकार, बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवर कारवाई करा.
- लहान मुले बाधित झाल्यास त्यांच्यावर उपचार होण्यासाठी सर्व उपाययोजना करा.
- औषधे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांची तयारी करा.
पुणे, दि. 7 : ‘कोरोना’च्या संभाव्य ‘तिसऱ्या लाटे’ची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिले.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार सिध्दार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांबरोबरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी राखून ठेवण्यात आला आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीतपणे होईल. पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना सरसकट सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी करता कामा नये, असे सांगून रेमडेसीवीरबाबतीत गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करुन दोषी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याबरोबरच काही रुग्णालये बिला साठी मृतदेह अडवून ठेवल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवरही कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी स्वतः हून नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. ऑक्सिजन युक्त व व्हेंटिलेटरयुक्त उपलब्ध खाटा, उपलब्ध लस याविषयी समन्वय ठेवून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना वैद्यकीय सेवा सुविधा अपुऱ्या पडू नयेत, याची दक्षता घेऊन काटेकोरपणे नियोजन करा,असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शासकीय यंत्रणेला दिले. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हीर इंजेक्शन आदी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड पुरेसे तयार होत आहेत. ऍक्टिव रुग्णसंख्या कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढतेय, ही दिलासादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होतील, ही शक्यता पाहून नियोजन करणे गरजेचे आहे.
खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. ऑक्सिजन प्लॅन्ट जलद उभे राहणे गरजेचे आहे, जेणेकरून ऑक्सिजन चा तुटवडा दूर होण्यास मदत होईल.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी कडक लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. व्हेंटिलेटरयुक्त बेड व ऑक्सिजनयुक्त बेड ची उपलब्धता सर्वसामान्यांना समजण्यासाठी नियोजन करावे.
यावेळी आमदार सर्वश्री अशोक पवार, सुनील टिंगरे, अतुल बेनके, संजय जगताप, मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही महत्वाचे विषय मांडले.
Former MP Shivajirao Adhalrao Patil’s demand to the Commissioner to set up a Jumbo Covid Care Center at Hadapsar.
Former MP Shivajirao Adhalrao Patil demanded that the Municipal Corporation should set up a Jumbo Covid Care Center at Hadapsar with all facilities so that the patients can get treatment on time. For this, Shiv Sena leader and former MP Shivajirao Adhalrao Patil met Vikram Kumar today. Shiv Sena district chief Vijay Deshmukh, corporator city organizer Sangeeta Thosar, corporator Pramodnana Bhangire, deputy city chief Sameer Tupe, assembly chief Rajendra Babar, assembly coordinator Tanaji Lonakar, division chief Prashant Poman and subdivision chief Mahendra Bankar were present on the occasion.
Vikram Kumar along with Shiv Sena office bearers inspected the gliding center here last week. There were some technical issues and it was discussed that a jumbo covid center would be set up in the Hadapsar area other than the gliding center. The Shiv Sena has demanded an immediate decision on the need for a Kovid Center at Hadapsar. Adhalrao Patil said that the Pune Municipal Corporation administration should take immediate action in this regard. He said that the demand has been made to start the vaccination center at the earliest in the Hadapsar area, mainly in Malwadi No. 15, Mahadev Nagar, and other areas.
हडपसर येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आयुक्तांकडे मागणी .
महापालिका हद्दीतील हडपसर उपनगरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे या परिस्थितीतून सर्वच रुग्णालयावर ताण येत आहे रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने हडपसर येथे सर्व सुविधांसह जम्बो कोविड केअर सेंटर करावी अशी आग्रही मागणी खासदार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. यासाठी शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज विक्रमकुमार यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख नगरसेविका शहर संघटक संगीता ठोसर नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे उप शहर प्रमुख समीर तुपे विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर विधानसभा समन्वयक तानाजी लोणकर विभाग प्रमुख प्रशांत पोमण उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर आदी उपस्थित होते.
येथील ग्लायडिंग सेंटर येथे गेल्या आठवड्यात विक्रमकुमार यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असून यावर चर्चा करण्यात आली व ग्लायडिंग सेंटर व्यतिरिक्त इतर कोठे हडपसर परिसरात जम्बो कोविड केंद्र उभारले तरी चालेल. हडपसर येथे कोविड सेंटरची गरज असून पालिकेच्या वतीने यावर याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पुणे महापालिका प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने याबाबत कार्यवाही करावी असे आढळराव पाटील यांनी सांगितले. हडपसर परिसरातील प्रामुख्याने माळवाडी 15 नंबर महादेव नगर व इतर भागात ही लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करून योग्य पुरवठा करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे या सर्व विषय आहेत त्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.
Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the 100-bed Covid Center at Warje-Malwadi.
The contribution of doctors, nurses, and paramedical staff in the fight against corona is significant
– Deputy Chief Minister Ajit Pawar
Pune, dt. 7: ‘The contribution of Corona warriors in the first panel along with doctors, nurses, paramedical staff in the fight against Corona is significant. Deputy Chief Minister Ajit Pawar expressed confidence that Corona patients in the area would get better health care facilities through the Covid Center at Warje-Malwadi during the growing period of Corona infection.
Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the 101-bed capacity ‘Chhatrapati Shivaji Maharaj Covid Center’ at Warje-Malwadi on the initiative of Councilor Sachin Dodke. He was talking at the time. MLA Sunil Tingre, MLA Ashok Pawar, MLA Sunil Shelke, Divisional Commissioner Saurabh Rao, Pune Municipal Commissioner Vikram Kumar, Pimpri Chinchwad Municipal Commissioner Santosh Patil, Collector Dr. Rajesh Deshmukh, Corporator Sachin Dodke, and office bearers were present. Doctors and medical care providers were also present through video conferencing.
Deputy Chief Minister Ajit Pawar said that all the agencies will have to work at the war level to provide the necessary medical facilities to the patients suffering from the corona. Emphasis is being placed on corona preventive vaccination for citizens between the ages of 18 and 44 in terms of corona prevention. The Covid Care Center, initiated by Councilor Sachin Dodke, will help patients in and around Warje to get immediate treatment. He said that the center would provide better medical facilities and relief to the patients in the area including Warje Malwadi.
Deputy Chief Minister Ajit Pawar said everyone should take precautions to prevent corona infection. He also appealed for hand washing, use of sanitizer, use of masks, and immediate check-up of corona symptoms. On this occasion, Deputy Chief Minister Ajit Pawar took detailed information about Covid Center. He also expressed satisfaction over the launch of Covid Center.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वारजे-माळवाडी येथील 100 बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन.
’कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ चे योगदान महत्वपूर्ण
– उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. 7 : ‘कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ सह पहिल्या फळीतील कोरोना योध्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. ‘कोरोना’ संसर्गाच्या वाढत्या काळात वारजे-माळवाडी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून या भागातील ‘कोरोना’च्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा-सुविधा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
वारजे-माळवाडी येथे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या 101 बेड क्षमतेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर’चे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त संतोष पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’ बाधित रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व यंत्रणांना युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. नगरसेवक सचिन दोडके यांनी पुढाकार घेवून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वारजे सह आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल. या सेंटरमुळे वारजे माळवाडीसह या परिसरातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा व दिलासा मिळेल, असे सांगून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्यावर या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड व्यवस्था होण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणे आवश्यक असून कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड सेंटरची सविस्तर माहिती घेतली. तसेच कोविड सेंटर सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
10 lakh 91 thousand 462 corona infected patients in the Pune division are cured.
Divisional Commissioner Saurabh Rao
Pune, dt. 7: 10 lakh 91 thousand 462 corona infected patients in the Pune division have recovered and gone home and the number of corona infected patients in the division has increased to 12 lakh 84 thousand 670. The number of active patients is 1 lakh 68 thousand 839. A total of 24,369 patients died of coronary heart disease, accounting for 1.90 percent. The recovery rate in the Pune division is 84.96 percent, informed Divisional Commissioner Saurabh Rao.
Pune District
There are a total of 8 lakh 95 thousand 227 patients with a corona in the Pune district. 7 lakh 81 thousand 539 patients have recovered and gone home. The active patient is 99 thousand 811. A total of 13,877 coronary heart disease patients have died. The mortality rate is 1.55 percent and the recovery rate is 87.30 percent.
पुणे विभागातील 10 लाख 91 हजार 462 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 7 : पुणे विभागातील 10 लाख 91 हजार 462 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 84 हजार 670 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 68 हजार 839 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 24 हजार 369 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 95 हजार 227 रुग्ण आहेत. तर 7 लाख 81 हजार 539 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 99 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.30 टक्के आहे
Deputy Chief Minister Ajit Pawar took a review of Pune district Kharif season preparations
Care should be taken to ensure that there is no shortage of seeds, fertilizers, and pesticides during Kharif season – Deputy Chief Minister Ajit Pawar
- Kharif planning on an area of 2 lakh 19 thousand 700 hectares
- Today finally 4 thousand quintals of seeds available, supply started as required
- Availability of 1 lakh 15 thousand metric tons of fertilizer
- The work of preparing the village wise plan of Kharif is in full swing
Pune, dt. 07: Deputy Chief Minister and Guardian Minister Ajit Pawar today directed to ensure that there is no shortage of seeds, fertilizers, and pesticides in the Kharif season.
In the Divisional Commissioner’s Office, Deputy Chief Minister Ajit Pawar today reviewed the availability of seeds, fertilizers, pesticides, and crop loans for the Kharif season. He was talking at the time. MLA Ashok Pawar, MLA Atul Benke, Collector Dr. Rajesh Deshmukh, Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad, Divisional Joint Director of Agriculture Basavaraj Birajdar, District Superintendent Agriculture Officer Dnyaneshwar Bote, Animal Husbandry Deputy Commissioner Dr. Shitalkumar Mukne, District Leading Bank Manager Anand Bedekar, MSEDCL Superintending Engineer Rajendra Pawar, Chandrasekhar Patil, etc. Officers were present.
Deputy Chief Minister Ajit Pawar said that 2 lakh 19 thousand 700 hectare area in Pune district has been planned for the Kharif season which includes paddy, sorghum, millet, groundnut, maize, soybean. For this, there will be no shortage of seeds, fertilizers, agricultural inputs as per the demand of the farmers, and the Department of Agriculture should plan very strictly regarding the availability of seeds and the quality of seeds. He also directed the concerned authorities to ensure that no farmer complains about fertilizers and seeds.
Deputy Chief Minister Ajit Pawar said that implementation of sugarcane wastage campaign, use of urea briquettes in paddy crops, control of humus, mechanization of paddy cultivation, etc. should be given impetus to innovation. He said that the production plan of the crops demanded in the market should be made available and implementation should be done expeditiously.
Collector Dr. Rajesh Deshmukh informed about the planning of Pune District Kharif Season 2021.
District Superintendent of Agriculture Dnyaneshwar Bote said that Kharif season has been planned on an area of two lakh 19 thousand 700 hectares. 26,000 quintals of seeds are required for this area. Out of which 4,000 quintals of seeds have been made available to date. The supply continues as required. Farmers should check the germination capacity of homegrown seeds for soybean seeds. One lakh 85 thousand metric tonnes has been sanctioned for fertilizers as against 90 thousand metric tonnes last season. This year 25 thousand metric tons of fertilizers have been supplied and a total of one lakh 15 thousand metric tons of fertilizers are available. However, farmers should apply fertilizer as per the recommendations given in the soil test. The work of preparing village wise plan for Kharif is in full swing.
Fertilizer and Demand Supply, Number of Agricultural Inputs Vendors Kharif Season Area, Agricultural Inputs and Quality Control, Crop Loan Allocation, Irrigation Planning, Agricultural Pump Power Supply, Scarcity Planning, Disaster Management, Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme, Agricultural Extension Program, Cropsap Project He gave detailed information about various schemes being implemented through the Department of Agriculture, including Agricultural Technology Management System, National Horticulture Mission, National Agricultural Development Scheme, Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, etc. Chief officers of various departments were present on the occasion.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हा खरीप हंगाम तयारीचा आढावा.
खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
- 2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन
- आज अखेर 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध, आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरु
- लाख 15 हजार मॅट्रीक टन खताची उपलब्धता
- खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरु
पुणे, दि. 07 : खरीप हंगामामध्ये बी बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, एकही पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ शितलकुमार मुकणे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर, महावितरण अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, चंद्रशेखर पाटील, आदींसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे यामध्ये, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, सोयाबीन यांचा समावेश आहे. यासाठी शेतक-यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कृषी निविष्टा यांची कमतरता भासणार नाही, तसेच कृषी विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व बियाणांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच खतांच्या व बियाणांच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
ऊस पाचट अभियानाची अंमलबजावणी, भात पिकांमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर, हुमणी नियंत्रण, यांत्रिकीकरण याद्वारे भात लागवड, आदि नाविण्यपूर्ण उपक्रमांना गती द्यावी असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्रात फळबाग लागवड करावी, आंबा लागवडीसाठी मागणीप्रमाणे शेतक-यांना कलमे उपलब्ध करून द्यावीत, तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा खरीप हंगाम 2021 च्या नियोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे म्हणाले, दोन लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रासाठी 26 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी आजपर्यंत 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरूच आहे. शेतक-यांनी सोयाबीन बियाण्याबाबत घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून वापर करावा. खतांमध्ये एक लाख 85 हजार मेट्रिक टनाची मंजूर असून मागील हंगामातील 90 हजार मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. चालू वर्षी 25 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून एकूण एक लाख 15 हजार मेट्रिक टन खतांची उपलब्धता आहे. तथापी शेतक-यांनी माती परिक्षणानुसार दिलेल्या शिफारसीप्रमाणे खताचा वापर करावा. खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.
खत व मागणी पुरवठा, कृषी निविष्टा विक्रेत्यांची संख्या खरीप हंगाम क्षेत्र, कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण, पिक कर्ज वाटप, सिंचन नियोजन, शेती पंपाचा विज पुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, आदींसह कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.