Online registration is required for vaccination on Monday 10th May.

Online registration is required for vaccination on Monday 10th May.

In order to prevent the spread of Coronavirus in the city of Pune, the citizens of the city (Healthcare class, Frontline class, 60 years of age, 25 years to 59 years of age, 18 to 44 years of age) should be given Covacin or Covidshield vaccine at various government hospitals within the Pune Municipal Corporation. From May 1, 2019, as per the instructions of the government, covid vaccination will be given to the beneficiaries in the age group of 18 to 44 in the Pune Municipal Corporation area. For vaccination, Kamla Nehru Hospital, Mangalwar Peth, Rajiv Gandhi Hospital, Yerawada, Annasaheb Magar Hospital, Hadapsar. This facility has been made available at Jayabai Sutar Hospital, Kothrud, Sassoon Hospital Station Road. The action to be taken by the citizens of this age group on Monday 10/5/2021 to vaccinate the citizens/beneficiaries aged 18 to 44 years will continue at the following vaccination sites. It is mandatory for you to register your time by registering at Arogya Setu or https://www.cowin.gov.in this website. To start appointment registration on this website, registration will start at 8 pm every night. After registration, the relevant vaccine will be given at the above-mentioned center. Citizens should not go to this vaccination center without registration, if they do not register their name, ready vaccines will not be given.

Citizens who have taken the first dose till March 22, 2021, will be given the second dose on Monday, May 10, 2019, and those who have made an online appointment for the first dose will be given the first dose up to 20% of the vaccination limit. It will be available to citizens above forty-five years.

सोमवार दिनांक १० मे रोजी लसीकरणा साठी ऑनलाईन  नोंदणी आवश्यक. 

पुणे शहरामध्ये विषाणू करोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रति प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शहरातील नागरिकांना ( हेल्थकेअर वर्ग, फ्रन्टलाइन वर्ग, साठ वर्षाच्या पुढील, पंचवीस वर्ष 59 वर्षापर्यंत, वय 18 ते 4४ पर्यंत) कोव्हॅक्सिं किंवा कोविडशील्ड लस,  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध सरकारी दवाखान्यात  देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे,   दिनांक 1 मे 2019 पासून पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या सूचनेनुसार 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड लसीकरण देण्यात येणार असून लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे  कमला नेहरू रुग्णालय मंगळवर पेठ , राजीव गांधी रुग्णालय येरवडा,  अण्णासाहेब मगर रुग्णालय हडपसर , कै. जयाबाईसुतार दवाखाना कोथरूड, ससून हॉस्पिटल स्टेशन रोड येथे  ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  सदर वयोगटातील नागरिकांनी उद्या सोमवार दिनांक १०/५/२०२१  रोजी वय वर्ष १८ ते ४४ नागरिकांना/ लाभार्थींना लसीकरण करावयाची  कारवाई  खालील लसीकरण ठिकाणी सुरू राहणार आहे. आरोग्य सेतू किंवा https://www.cowin.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करून आपण आपली वेळ नोंदवणे  बंधनकारक आहे . सदर संकेतस्थळावर अपॉइंटमेंट नोंदणी करणे सुरू करण्याकरिता नोंदणी रोज रात्री ८ वाजता सुरु करण्यात येईल  नाव नोंदणी झाल्यानंतर वरील  नमूद केलेल्या केंद्रावर संबंधित लस  देण्यात येणार आहे.  सदर लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नोंदणी न करता जाऊ नये,  नाव नोंदणी न केल्यास तयार लस  देण्यात येणार नाही.

ज्या नागरिकांनी दिनांक 22 मार्च 2021 पर्यंत चा पहिला डोस घेतला आहे अशाच नागरिकांना उद्या सोमवार दिनांक 10 मे 2019 रोजी प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे तसेच ज्या नागरिकांनी पहिला डोस साठी ऑनलाईन अपॉइंटमेंट  घेतली आहे अशा नागरिकांना लसीकरणाच्या  20 टक्के मर्यादेपर्यंतच पहिला डोस देण्यात येणार आहे हे लसीकरण पंचेचाळीस वर्षावरील  नागरिकांना उपलब्ध होणार  आहे.

 

 Pune city Corona update as on 8/5/2021

The Health system gets relief: f Corona’s new constraints in the city are beginning to come down.

 The graph of Corona’s new constraints in the city is beginning to come down somewhat. So the health system has also got some relief. By the end of May 6, the duration of the city’s corona has doubled to 100 days. A month ago, the period was 11 days. However, since the fourth week of April, the number of new cases has been declining to 100 days. For the first time in the last two months, the city has 675 oxygen beds free, the health department said. As a result, the stress on the health system has been reduced to some extent.

 The second wave of the corona has found more than two and a half million infected in the city in just two months, putting a huge strain on the health system due to the high number of patients in need of oxygen during this period. In the first week of April it was difficult to get oxygen beds in the city. The lockdown in the city started on April 2, the restrictions were increased from April 8, and it was tightened from April 14. The lockdown has been declared till May 15 and the positive results of the weekend lockdown in Pune are beginning to show and the number of patients in the city has started declining significantly.

According to the health department, the number of beds taken over by the corporation and the oxygen beds started by the corporation as well as other beds are 10763 out of which about 1465 beds are empty. It has about 664 oxygen beds and 8 ICU beds And 3 ventilator beds. So for the first time in the last two months, with such a large number of beds available, the health system has also got some relief and rest.

आरोग्य यंत्रणेला मिळाला दिलासा :  पुण्यात रुग्ण दुपटीचा वेग शंभर दिवसांवर . 

 शहरातील कोरोनाच्या  नव्या बाधित्यांचा  आलेख काहीसा उतरण्यास सुरुवात झाली  आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला  काहीसा दिलासा मिळाला आहे.  ६ मे अखेर  शहरातील कोरोना दुपटीचा कालावधी १०० दिवसांवर आला आहे.  एक महिन्यापूर्वी हा  कालावधी ११ दिवसांवर आला होता . मात्र एप्रिलच्या चौथ्या  आठवड्यापासून नवीन बाधितांचा  आकडा घटू  लागल्याने हा कालावधी १०० दिवसांवर गेला आहे.  तर गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदा शहरात ऑक्सिजनचे ६७५ बेड शिल्लक  असल्याचे आरोग्य यंत्रणेने  सांगितले.  त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताणही काही प्रमाणात कमी झाला आहे. 

 कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत  दोन महिन्यात शहरात अडीच लाखापेक्षा अधिक  बाधित सापडले आहेत,  या कालावधीत ऑक्सिजनची  गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरात ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले होते. २ एप्रिलला शहरात लॉकडाउनला सुरवात झाली  तर ८ एप्रिल पासुन निर्बंध वाढविण्यात आले, तर १४  एप्रिलपासून ते अधिक कडक करण्यात आले. आता १५ मे  पर्यंत लॉक डाउन जाहीर करण्यात आला असून तसेच पुण्यातील वीकएंड लॉक डाउन याचे सकारात्मक परिणाम दिसू लागण्यास सुरु झाले असून शहरातील रुग्ण संख्या लक्षणीय घटण्यास सुरुवात झाली आहे.  आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महापालिकेने ताब्यात  घेतलेले बेड तसेच पालिकेने सुरु केलेले ऑक्सिजन बेड तसेच इतर बेडची संख्या १०७६३ असून त्यातील सुमारे १४६५ बेड रिकामे आहेत. त्यात सुमारे ६६४ ऑक्सिजन बेड तर ८  आय  सी  यू  बेड  आणि ३ व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बेड शिल्लक असल्याने  आरोग्य यंत्रणेलाही थोडी विश्रांती मिळाली आहे. 

 

Electric Crematorium work at Ganganagar completed.

Ganesh Dhore, a corporator of Pune Municipal Corporation Ward No. 42, was pursuing the idea that the Ganganagar cemetery in Fursungi, which is included in the Pune Municipal Corporation, should have an electric cremation system with a traditional cremation system.  Taking note of this, the work of installing electricity has been completed by the Municipal Electricity Department, with the funds received from the Ministry of Forest and Environment and Meteorology. Pune Municipal Corporation Electricity Department officials have completed this work promptly and it was inspected by Corporator Dhore. Now Pune Municipal Corporation has also started using Electric Crematorium here.

Dhore said that the corporation has received funds from the corporation for the installation of a similar modern and environmentally friendly Electric Crematorium in the Fursungi cemetery and the work will be started soon.

गंगानगर स्मशानभूमीतील विदुतदाहिनेचे  काम पूर्ण . 

महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या, फुरसुंगी मधील गंगानगर स्मशानभूमीमध्ये पारंपारिक दहन व्यवस्थेसह  विद्युतदाहिनी ची व्यवस्था असावी यासाठी,  पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 42 चे नगरसेवक गणेश ढोरे पाठपुरावा करीत होते . याची दखल घेत पालिका विद्युत विभागाने,  वन व पर्यावरण हवामान मंत्रालय यांच्याकडून प्राप्त निधीतून विद्युतदाहिनी बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.  पुणे मनपा विद्युत विभाग अधिकाऱ्यांनी  हे काम तत्परतेने पूर्ण केले असून त्याची पाहणी नगरसेवक ढोरे यांनी केली.  आता पुणे महानगर पालिकेच्या वतीने येथील विद्युतदाहिनीचा वापरही सुरू  करण्यात आला आहे.   

फुरसुंगी स्मशानभूमीत  अशाच प्रकारच्या आधुनिक व  पर्यावरण पूरक विद्युतदाहिनी बसवण्यासाठी महानगरपालिकेकडून निधी प्राप्त करून घेतला असून सदर कामही लवकरच सुरु करण्यात येईल असे  ढोरे यांनी सांगितले. 

Prashant Jagtap emphasized strengthening the party in the city.

Strengthening the party while working as city president will be a priority. NCP’s newly-appointed city president Prashant Jagtap said on Saturday that the party would come first in the forthcoming municipal elections on the same strength.

The new executive committee announced before the anniversary of the party.

 

The new executive committee of the Nationalist Congress Party will be announced before the anniversary of the party. The decision regarding the office bearers in the Municipal Corporation will be taken by the party leaders of NCP. Prashant Jagtap said that in the coming municipal elections, we will bring the BJP to its original number.

Prashant Jagtap, President, Pune City Nationalist Congress Party.

 

He also claimed that the Bharatiya Janata Party will be brought to the number of former corporators in the coming municipal elections. Former mayor Jagtap took over on Saturday after being elected as the city president of the Nationalist Congress Party, after which he spoke to reporters at the Pune Shramik Patrakar Sangh. Municipal elections will be held in the next nine months, so the emphasis will be on strengthening the party in the available time. The NCP will come down in full force. Jagtap clarified that the party leaders would decide whether to contest this election as a Mahavikas front or on their own. BJP is taking credit for the projects started during the NCP rule in Jagtap city by criticizing that the budget of Rs. But their corporators are busy issuing tenders and approving bills, so there is dissatisfaction in the minds of the people and we will bring the BJP back to its original number in the coming elections. 11 new villages near Pune are being included in the municipal corporation. The NCP is already in touch with this village. Therefore, the inclusion of this village in the municipality will definitely benefit the NCP. We will not allow injustice to happen to Pune in terms of water. Mr. Jagtap also said that if need be, we will try to get drinking water from Mulshi Dam through the Guardian Minister and Deputy Chief Minister Ajit Pawar.

शहरात पक्ष मजबूत करण्यावर भर   प्रशांत जगताप. 

 शहराध्यक्ष म्हणून काम करताना पक्ष मजबूत करणे ही प्राथमिकता असेल.  तसेच त्या बळावरच येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या स्थानी येईल असे पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शनिवारी सांगितले. 

वर्धापनदिना आधी नवी कार्यकारिणी करणार जाहीर .

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची नवीन कार्यकरिणी पक्ष्याच्या वर्धापन दिनाच्या आधी जाहीर केली जाईल. महापालिकेतील पदाधिकारी बाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे पक्ष श्रेष्ठी घेतील . येत्या महापालिका निवडणुकीत आम्हाला भाजपला त्यांच्या मूळ संख्येवर आणून ठेऊ असे प्रशांत जगताप म्हणाले.

 

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष,पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला येत्या महानगरपालिका निवडणुकीत पूर्वीच्या नगरसेवकांच्या संख्येवर आणून ठेवू असा दावाही त्यांनी केला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर माजी महापौर जगताप यांनी शनिवारी पदभार स्वीकारला, त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी  संवाद साधला . येत्या नऊ महिन्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यामुळे उपलब्ध काळात पक्ष मजबूत करण्यावर भर असेल . राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने  उतरेल. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायची  की स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे जगताप यांनी स्पष्ट केले.  आठ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पुणे महानगरपालिका  कोरोनाच्या काळात नागरिकांचे  प्राण वाचू शकले नाही,   अशी टीका करून जगताप शहरात राष्ट्रवादी सत्तेत असताना सुरु झालेल्या प्रकल्पांचे श्रेय भाजप  घेत आहे उमेदवार आयात करून भाजपने सत्ता मिळवली.  परंतु  त्यांचे नगरसेवक निविदा काढणे आणि बिले  मंजूर करणे यातच  व्यग्र आहेत त्यामुळे जनतेच्या मनात असंतोष असून  येत्या निवडणुकीत आम्ही  भाजपला मूळ संख्येवर आणून ठेऊ . पुण्यालगतच्या नव्या ११ गावांचा महापालिकेत समावेश होत आहे या गावामध्ये पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचा   संपर्क आहे, काम आहे. त्यामुळे या गावाचा पालिकेत समावेश झाल्याचा राष्ट्रवादीला नक्कीच फायदा होईल.  पाण्याच्या बाबतीत आम्ही  पुण्यावर अन्याय होऊ देणार नाही. गरज भासल्यास मुळशी धरणातून पाणी पिण्यासाठी घेण्यासाठी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत प्रयत्न करू असेही श्री जगताप म्हणाले. 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *