येत्या 26 नोव्हेंबर रोजी ससंद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘संविधान दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली, 26 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता मध्यवर्ती सांभागृहात मुख्य कार्यक्रम.
उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि खासदारांसह अनेक मान्यवर राहणार उपस्थित.
राष्ट्रपती संविधानाच्या उद्देशिकेचे वचन करत असतांना सर्व नगरिकांनीही कोविड आचारसंहितेचे पालन करत आपापल्या जागी राहून या वाचनात सहभागी होण्याचे जनतेला आवाहन.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून, भारताची 75 प्रगतीशील वर्षे आणि त्याआधीचा भारतीय लोक त्यांची संस्कृती आणि त्यांनी मिळवलेल्या यशांचा वैभवसंपन्न इतिहास साजरा करण्यासाठी, यंदाचा 26 नोव्हेंबर रोजी होणारा संविधान दिन अधिक जोश, उत्साह आणि आनंदाने साजरा होणार असून संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात एक विशेष सोहळा होणार आहे.
केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि सनदीय व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन आणि माहिती आणि परसारण राज्यमंत्री श्री व्ही मुरुगन यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद देऊन ही माहिती दिली. येत्या 26 जानेवारी रोजी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून हा दिवस विशेषत्वाने साजरा केला जाणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या नेतृत्वाखाली हा संविधान दिवस संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात साजरा होत आहे.
यावेळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती, केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संसद टीव्ही/डीडी आणि इतर टीव्ही वाहिन्यांवरुन तसेच ऑनलाईन पोर्टलवरुन थेट दाखवला जाणार आहे.
राष्ट्रपतींच्या भाषणानंतर, संपूर्ण देश त्यांच्यासोबत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करणार आहे.
या कार्यक्रमात, केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, संस्था, बार कौन्सिल, इत्यादी संस्थांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियम लागू असल्याने, सर्व संस्थांमधील लोकांसह, नागरिकांनी, 26 नोव्हेंबर 2021 रोजी, आपापल्या जागी राहून माननीय राष्ट्रपतींसमवेत या उद्देशिकेचे वाचन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींसोबत या उद्देशिकेचे अधिकाधिक लोकांनी जाहीर वाचन करण्याविषयी आवाहन करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रेडियो, टीव्ही, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून हे वाचन करायचे आहे.
ही एक जनचळवळ व्हावी आणि त्यात लोकांचा सहभाग वाढावा, या साठी संसदीय कार्य मंत्रालयाने दोन विशेष पोर्टल तयार केले आहेत. एक पोर्टल “संविधानाच्या उद्देशिकेचे ऑनलाईन वाचन” असे असून, ते 23 भाषांमध्ये ( 22 अधिकृत भाषा आणि इंग्रजी) उपलब्ध आहे. आणि दुसरे पोर्टल “घटनात्मक लोकशाहीवर ऑनलाईन प्रश्नमंजूषा ” ( mpa.nic.in/constitution-day) असे असून या पोर्टलवर कुणीही, कुठूनही सहभागी होऊ शकतो आणि प्रशस्तीपत्र मिळवू शकतो.
23 भाषांत (ज्यात 22 अधिकृत भाषा आहेत आणि एक इंग्लिश) “संविधानाची उद्देशिका वाचण्यासाठी ऑनलाईन पोर्टल” ( mpa.nic.in/constitution-day) विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल 26 नोव्हेंबर 2021 पासून कार्यान्वित होईल. यावर कुणीही नोंदणी करू शकतो आणि संविधानाची उद्देशिका 23 पैकी कुठल्याही भाषेत वाचून प्रशस्तीपत्र मिळवू शकतो, असेही त्यांनी सांगितले
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित जयप्रकाश लाखीवाल यांनी या पोर्टलसाठी उद्देशिकेची चौकट अशा प्रकारे तयार केली आहे, की त्यात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील कलांचा समावेश आहे. हे रेखाचित्र सर्व प्रशास्तीपात्रांवर छापले जाईल.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय उत्सव बनविण्यासाठी, आपण सर्वांनी आपापली प्रशस्तीपत्रे, समाज माध्यमांवर शेयर करूया.