संशोधन क्षेत्रात स्त्री संशोधकांना भारत जर्मनी यांच्या संयुक्त संशोधन व विकास प्रकल्पावर थेट प्रवेश

Indo-German Science & Technology Centre

संशोधन क्षेत्रात स्त्री संशोधकांना भारत जर्मनी यांच्या संयुक्त संशोधन व विकास प्रकल्पावर थेट प्रवेश देणाऱ्या पहिल्या उपक्रमाला प्रारंभ.

Indo-German Science & Technology Centreसंशोधन आणि विकसन या क्षेत्रात स्त्रियांना थेट प्रवेश देणाऱ्या, प्रोत्साहनपर अशा पहिल्या उपक्रमाला काल प्रारंभ झाला. ‘विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग’ (WISER) अशा नावाच्या उपक्रमाला काल ‘भारत जर्मन विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र’ (IGSTC) यांच्यातर्फे आरंभ झाला. दोन्ही देशांच्या संयुक्त संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये स्त्री संशोधकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारा, अशा तर्‍हेचा हा पहिलाच उपक्रम आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आंतरराष्ट्रीय सहभाग विभागाचे भारतीय अध्यक्ष आणि प्रमुख एस. के. वार्ष्णेय यांनी या उपक्रमातून स्त्री-पुरुष समानता साकार होण्यास मदत होईल. तसेच, ‘भारत जर्मन विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र’ (IGSTC)च्या या उपक्रमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढेल याकडे लक्ष वेधले.

भारत-जर्मनी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र यांच्यातर्फे सध्या सुरू असलेल्या 2+2 प्रमुख उपक्रमांमध्ये हा अजून एक उपक्रम सुरू होत आहे असे उपक्रमाचे जर्मन सहअध्यक्ष आणि भारत जर्मन विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे सचिव स्तरावरील सदस्य व जर्मन शिक्षण संशोधन मंत्रालयाचे उलक रेपोर्टस यांनी यावेळी सांगितले.

भारत जर्मन विज्ञान-तंत्रज्ञान केंद्राचा हा कार्यक्रम म्हणजे भारत सरकारचे शिक्षण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), तसेच जर्मन सरकारच्या शिक्षण आणि फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च (BMBF) यांचा संयुक्त उपक्रम आहे. हा कार्यक्रम संशोधन संस्था किंवा उद्योगांमध्ये अथवा शिक्षण क्षेत्रात संशोधन स्तरावरील काम करणाऱ्या स्त्री वैज्ञानिकांना सहाय्यक प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्य करणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमात स्त्री संशोधकांना थेट प्रवेशाद्वारे सहभाग घेता येईल, तसेच त्यासाठी वयाची मर्यादा किंवा कारकिर्दीमध्ये खंड पडण्याची कोणतीही भीती नाही. त्याचप्रमाणे या क्षेत्रात सुलभपणे सहभागी होऊ देणारा असा हा उपक्रम आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या भारतीय महिला संशोधकांसाठी 39 लाख रुपये तर जर्मनीकडून सहभागी होणाऱ्या महिला संशोधकांसाठी 48000 युरो एवढी कमाल रक्कम सहाय्य भारत-जर्मनी विज्ञान-तंत्रज्ञान केंद्राकडून दिली जाईल. दरवर्षी 20 जणांना ही संधी मिळेल.

दोन्ही देशांच्या ख्यातनाम स्त्री संशोधकांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डॉक्टर टेसी थॉमस, इस्रोच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मुथय्या वनिथा या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या तर हेलबोर्न येथील युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सच्या निकोला मार्सडेन आणि टेक्‍निकल युनिव्हर्सिटी बर्लिनच्या पेट्रा लाऊंच या जर्मनीच्या बाजूने उपस्थित होत्या. त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात स्त्रियांना सहभागी होता येण्यासाठी अशा बऱ्याच या उपक्रमांची गरज स्पष्ट केली. WISE-KIRAN च्या निशा मेहंदीरट्टा या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *