‘दक्षिण शक्ती’ युद्धसरावाचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुखांनी दिली जैसलमेरला भेट.

REVIEW EXERCISE DAKSHIN SHAKTI

‘दक्षिण शक्ती’ युद्धसरावाचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुखांनी दिली जैसलमेरला भेट.

REVIEW EXERCISE DAKSHIN SHAKTIलष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या दोन दिवसांच्या जैसलमेर (राजस्थान) दौऱ्याची आज सांगता झाली. या दौऱ्यात लष्कर प्रमुखांनी भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडने घेतलेल्या  ‘दक्षिण शक्ती ‘ युद्ध सरावाचा आढावा घेतला. एकाहून अधिक ठिकाणी मोहिमा राबवताना लष्कराच्या शक्तीचा एकत्रित वापर करणे आणि संघर्ष सुरु असलेल्या संपूर्ण क्षेत्रात देशाचे लष्करी उद्देश पूर्ण करणे हा या सरावाचा उद्देश होता.

गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या या सरावात, भारतीय लष्कराच्या विविध घटक आणि विभागांनी भाग घेतला. याचा भाग म्हणून युद्धभूमी सदृश वातारणात लष्कराच्या विविध पलटण, यांत्रिक कवायती आणि हवाई ट्रूप्स यांनी रणनीतिक आणि सैन्य कारवाई करत भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सराव केला. यात बहुमुखी आणि पूर्णपणे देशी बनावटीच्या प्रगत हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर (शस्त्र प्रणाली बसविलेले), स्वार्न ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे एकत्रित कार्य आणि गुप्तवार्ता   रेकी यंत्रणांचा एकत्रीत वापर करण्यात आला.

या सरावात विशेष हेलीबोर्न मोहिमा, स्वार्न ड्रोन आणि एएलएच हाताळणी आणि त्याला सुसंगत जमिनीवरील ट्रूप्सच्या कारवाया याचे जबरदस्त प्रदर्शन याचा देखील सराव करण्यात आला. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत लष्करात सामील करण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या उपकरणांची क्षमता चाचणी करून वापर केल्याबद्दल लास्कर प्रमुखांनी सदर्न कमांडचे अभिनंदन केले.

‘भविष्यातील युद्धे’ लढण्यासाठी सतत विकसित होणाऱ्या रणनीती, तंत्रज्ञान आणि पद्धतीची गरज, तसेच मानवचालीत आणि मानवरहित प्रणालीच्या सुधारणांवर त्यांनी भर दिला.

या सरावात सहभागी झालेल्या सर्वांची सिद्धता आणि मोहिमांसाठी असलेली तयारी यासाठी लष्कर प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले आणि देशाच्या संरक्षणासाठी सदैव जागृत राहण्यास प्रोत्साहन दिले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *